शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पीएमआरडीए रिंगरोडसाठी काढणार कर्ज

By admin | Updated: June 23, 2017 04:31 IST

पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या वतीने (पीएमआरडीए) केल्या जाणाऱ्या रिंग रोडसाठी सुमारे साडेसहा हजार कोटी रुपयांचे कर्ज काढले जाणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या वतीने (पीएमआरडीए) केल्या जाणाऱ्या रिंग रोडसाठी सुमारे साडेसहा हजार कोटी रुपयांचे कर्ज काढले जाणार आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी नगर रचना योजना (टी.पी.स्किम) राबविण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. १२९ किलोमीटर लांबीच्या रिंग रोडसाठी सुमारे १९ हजार २३९ कोटींचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती पालकमंत्री गिरीष बापट यांनी दिली. मुंबई येथे गुरूवारी प्राधिकरणाची बैठक झाली. यावेळी महापौर मुक्ता टिळक, पिंपरी- चिंचवडचे महापौर नितीन काजळे, पुणे महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष सीमा सावळे, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, पुणे महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार आदी उपस्थित होते. रिंग रोडसाठी सुमारे १ हजार ४३० हेक्टर इतक्या जागेची आवश्यकता असून हवेली, मावळ, मुळशी व खेड या चार तालुक्यातील ५८ गावांमधील सुमारे २ हजार ३७ गटामधील जागेचा रिंग रोड मध्ये समावेश आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनी नगर रचना योजनेद्वारे संपादन करण्यात येणार आहेत. नगर रचना योजना तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आलेली आहे.तसेच या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी तांत्रिक सल्लागार म्हणून आयसीसी, मोनार्च, ट्रिपलई या सल्लागारांची नेमणूक केली आहे. नगर रचना योजनेतून पीएमआरडीएस मिळणाऱ्या व्यावसायिक दृष्ट्या विकासास योग्य अशा जमिनीच्या भाडेपट्टा, विक्रीतून तसेच रिंग रोडच्या दोन्ही बाजूस ५०० मीटर अंतरापर्यंत बांधकामासाठी चार चटई क्षेत्रावर (एफएसआय) प्रीमियम आकारला जाईल. या माध्यमातून संपूर्ण नगर रचना योजनेच्या उभारणीचा खर्च व रिंग रोडसाठी लागणारा खर्च उभारण्यात येणार आहे. प्रकल्पाचे सुरुवातीस बीज भांडवलापोटी पीएमआरडीए व राज्य शासन आवश्यक तो निधी उपलब्ध करून देणार आहे. नगर रचना योजनेतील सुमारे ५०० हेक्टर इतकी जागा आर्थिक दुर्बल घटकासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे या घटकांना पुणे महानगर प्रदेश क्षेत्रात दोन लाखाहून अधिक घरे उपलब्ध होणार आहेत. नगर रचना योजनेमुळे प्राधिकरण क्षेत्रात नियोजित विकास होणार आहे.