मंचर : पिंपळगाव खडकी ग्रामपंचायतीने करवसुली होण्यासाठी वेगळीच योजना जाहीर केली आहे. ग्रामपंचायतीचे कर पूर्णपणे भरणाऱ्या ग्रामस्थांना महिन्याभरासाठी थंड पाण्याचा जार देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.पिंपळगाव तर्फे महाळुंगे ग्रामपंचायतीच्या मासिक बैैठकीत घरपट्टी आणि ग्रामपंचायतीचे इतर थकीत करवसुलीसाठी ग्रामपंचायतीतर्फे ग्रामस्थांनी एक आकर्षक योजना जाहीर करण्यात आली. ज्या ग्रामस्थांची ३१ मार्च २०१७ पर्यंत ग्रामपंचायतीमध्ये घरपट्टी आणि इतर कोणतीही कराची थकबाकी नसेल अशा सर्व ग्रामस्थांना १ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत प्रतिकुटुंब थंड पाण्याचा वीस लिटरचा एक जार मोफत देण्यात येणार असल्याची माहिती पिंपळगावचे ग्रामपंचायत सदस्य आणि शिवसेनेचे विभागप्रमुख दीपक गंगाराम पोखरकर यांनी दिली. या वेळेस सरपंच संगीता उत्तम पोखरकर, उपसरपंच अंकुश पोखरकर, ग्रामपंचायत सदस्या सुनंदा पोखरकर, छाया पोखरकर, बाळासाहेब बांगर उपस्थित होते.(वार्ताहर)
कर भरा; थंड पाण्याचा जार मिळवा
By admin | Updated: March 23, 2017 04:11 IST