शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग द्या

By admin | Updated: January 12, 2017 01:56 IST

राज्यातील ५६ महामंडळांपैकी राज्य परिवहन महामंडळ (एसटी) हे सर्वसामान्य जनतेसाठी अत्यावश्यक असे महामंडळ आहे. परंतु

भोर : राज्यातील ५६ महामंडळांपैकी राज्य परिवहन महामंडळ (एसटी) हे सर्वसामान्य जनतेसाठी अत्यावश्यक असे महामंडळ आहे. परंतु, याच महामंडळातील कर्मचाऱ्यांवर वेतनाबाबत नेहमीच अन्याय होत आला आहे. राज्य शासनाने त्यांच्यावरील हा अन्याय दूर होण्यासाठी वेतन करार करण्याऐवजी वेतन आयोग द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचे राज्याचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केली.२० जानेवारी रोजी मुंबईत एसटी कामगार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने भोर एसटी आगारात कामगार संघटनेचा मेळावा आयोजित केला होता, त्या वेळी शिंदे बोलत होते. या वेळी एसटी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहन जेधे, सचिव दिलीप परब, दादासाो चव्हाण, बबलू वाल्मीकी, शरद खोपडे, धनंजय कांबळे, बाळासाो शिर्के, राजेंद्र भेलके, दिलीप वरे मनोज पाटणे व कर्मचारी उपस्थित होते. दिलीप सोनवणे यांनी प्रास्ताविक केले.या वेळी संदीप शिंदे म्हणाले, ‘‘एसटी कामगार संघटना ही राजकारणविरहित संघटना असल्याने ती संपविण्याचा अनेकांचा प्रयत्न आहे. परंतु, कामगारांच्या पाठिंब्यावर कामगारांच्या हिताचे प्रश्न घेऊन संघटना आजही खंबीरपणे उभी आहे. एसटी महामंडळातील १८२ (ब) कलमाचा सूडबुद्धीने वापर केला जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या नाहक त्रास होत असल्याने ते कलम रद्द करा.’’या मेळाव्यात भोर एसटी आगारातील सेवानिवृत्त कर्मचारी मोहन बांदल, हनिप शेख, दीपक शेक, अजित भिडे, नारायण गोगावले, अनिल शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)