शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पवार म्हणाले ‘त्यांच्या पोटात नक्की दुखले असेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:10 IST

पुणे : भामा आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पामुळे पुण्याच्या १४ लाख लोकांना पाणी मिळणार आहे. पण यामुळे काही लोकांच्या पोटात नक्की ...

पुणे : भामा आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पामुळे पुण्याच्या १४ लाख लोकांना पाणी मिळणार आहे. पण यामुळे काही लोकांच्या पोटात नक्की दुखले असेल, असा चिमटा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काढला.

भामा आसखेड प्रकल्पाचे ऑनलाईन लोकार्पण केल्यानंतर ते शुक्रवारी (दि. १) बोलत होते. पवार म्हणाले, की हा प्रकल्प पूर्ण करण्याची अवदसा कुठून आठवली आणि निघाले हे पाणी द्यायला यांना असेच टँकरमाफियांना वाटत असेल.

पूर्व पुण्यातल्या वडगाव शेरी, खराडी, चंदननगर, धानोरी, कळस आदी भागातल्या सततच्या पाणी टंचाईमुळे येथील लोक त्रस्त होते. जुन्या बारामती लोकसभा मतदारसंघात पुण्याचा हा काही भाग येत असे. त्यावेळी मत मागायला गेल्यानंतर लोक म्हणत, ‘मत देतो पण पाणी द्या.’ या भागात टँकर माफियांचे राज्य चालायचे, ते कशारितीने पाणी द्यायचे हे मला माहिती आहे. या योजनेमुळे येथील नागरिकांची स्वप्नपुर्ती झाल्याचा मनस्वी आनंद आहे.

चौकट

चंद्रकांतदादांची सूचना मान्य

“भामा आसखेडचे पाणी पुण्यात आल्याने खडकवासला धरण साखळीतून होणारा पाणीपुर‌वठा कमी होण्याची भीती पुणेकरांना वाटते. हा पुरवठा कमी करु नये अशी विनंती मी अजित पवार यांना करतो,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले. पुण्याचे पिण्याचे पाणी आणि शेतीचे पाणी याचे नियोजन करण्यासाठी सर्व यंत्रणांची बैठक घ्यावी, असेही पाटील यांनी सुचवले. अजित पवार यांनी ही सूचना मान्य केली. ग्राम पंचायत निवडणुकीनंतर सर्व संबंधितांची बैठक घेऊन पुण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

चौकट

पुण्याचा वाढता पाणीवापर

अजित पवार म्हणाले की १९९१ मध्ये पुण्याला पाच टीएमसी पाणी लागत असे. आता ही गरज साडे सतरा-अठरा टीएमसीवर गेली आहे. पुण्यात दरडोई दैनंदिन पाणीपुरवठा सव्वातीनशे लिटर होतो. वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया योग्य झाल्यास या पाण्याचा पुनर्वापर शेतीसाठी करता येईल. पाण्याची उपलब्धता नसलेल्या शहरांचा विकास खुंटतो. या पार्श्वभूमीवर “पुण्याच्या पाण्याची वाढती गरज भागवण्यासाठी नियोजन केले जाईल पण पुण्याला पाणी कमी पडू दिले जाणार नाही,” असे पवार यांनी स्पष्ट केले.