कोंढवा : कोंढवा खुर्द येथील माय फेअर एलग्नझा सोसायटीसमोरील रस्त्याला लागून असलेला फुटपाथ अनेक समस्येमुळे वापरशून्य झाला आहे. या सोसायटीसमोरून जाणाºया रस्त्याच्या कडेला महापालिकेच्या वतीने पादचाºयांसाठी फुटपाथ तयार करण्यात आला आहे.महावितरण कार्यालयासमोरून गेलेला हा रस्ता पुढे वेलकम कार्यालयाजवळ जाऊन मिळतो. या रस्त्याच्या डावीकडे पालिकेने फुटपाथ बनवून त्यावर पेव्हिंग ब्लॉक बसविले आहेत.जेणेकरून या छोट्या रुंदीच्या रस्त्यावरून पादचारी या फुटपाथचा वापर करून सुरक्षितपणे ये-जा करू शकतात. परंतु काही ठिकाणी या फुटपाथवर दुचाकी वाहने पार्क केली जात आहेत तर काही ठिकाणी या फुटपाथचा वापर टाकाऊ वस्तू टाकण्यासाठी होत आहे.या सर्व गोष्टींच्या मुळे पादचारी रस्त्यावरून ये-जा करीत आहेत. लवकरात लवकर पालिकेने या फुटपाथवर पडलेला राडारोडा हलवावा व वाहतूक पोलिसांनी फुटपाथवर लावलेल्या दुचाकीवर कारवाई करावी. जेणेकरुन पादचारी सुरक्षितपणे चालू शकतात व जनतेचे लाखो रुपये खर्च करून तयार केलेला फुटपाथ वापर विना पडून राहणार नाही, अशी मागणी पादचारी करीत आहेत.
फुटपाथ झाला वापरशून्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 04:03 IST