शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पासचा तीन कोटींचा प्रसाद

By admin | Updated: September 7, 2016 01:50 IST

प्रवासीवाढीसाठी पीएमपीकडून सुरू करण्यात आलेल्या दररोजच्या सवलतीच्या पासमुळे पीएमपीला महिन्याला मिळणाऱ्या पासच्या उत्पन्नाने विक्रमी आकडा गाठला आहे

पुणे : प्रवासीवाढीसाठी पीएमपीकडून सुरू करण्यात आलेल्या दररोजच्या सवलतीच्या पासमुळे पीएमपीला महिन्याला मिळणाऱ्या पासच्या उत्पन्नाने विक्रमी आकडा गाठला आहे. आॅगस्ट महिन्यात अवघे १५ दिवस असलेल्या या सवलतीने पीएमपीच्या मासिक पासच्या उत्पन्नात तब्बल ३ कोटींची भर घातली असून, हा आकडा ११ कोटींच्या घरात पोहोचला आहे. जुलै २०१६ मध्ये हेच पासचे उत्पन्न ८ कोटी २२ लाख रुपये होते. मात्र, या सवलतीचा पासमुळे मासिक आणि साप्ताहिक व मासिक पासच्या विक्रीमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली आहे. या प्रवाशांनाही दैनंदिन पासलाचा पसंती दिली असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीमधून समोर आले आहे. ‘संगमवाडी ते विश्रांतवाडी’ या मार्गाच्या वर्षपूर्ती निमित्ताने पीएमपी प्रशासनाकडून दैनंदिन पासची किंमत ७० रुपयांवरून ५० रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही सवलत अवघी १५ दिवस देण्यात येणार होती. ही सवलत देण्यापूर्वी म्हणजेच, १४ आॅगस्टपूर्वी दिवसाला ३ हजार पासची विक्री होत होती. तर, १४ आॅगस्टपर्यंत १५ हजार पासची विक्री झाली. मात्र, सवलतीनंतर या पासच्या विक्रीत कित्येक पटींनी वाढ झाली. प्रवाशांनी या पासवर अक्षरश: उड्या घेतल्या. त्यामुळे या पासची विक्री आॅगस्टच्या शेवटच्या दोन आठवड्यात थेट ३ लाख ६६ हजारांच्या घरात गेली.