शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांनी रोखली डेक्कन एक्स्प्रेस

By admin | Updated: May 1, 2016 03:02 IST

डेक्क्कन क्वीनच्या डब्यातील वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याने प्रवाशांनी डेक्कन क्वीन छत्रपती शिवाजी टर्मिनल (सीएसटी) स्थानकावर तब्बल पाऊण तास रोखून धरली.

पुणे : डेक्क्कन क्वीनच्या डब्यातील वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याने प्रवाशांनी डेक्कन क्वीन छत्रपती शिवाजी टर्मिनल (सीएसटी) स्थानकावर तब्बल पाऊण तास रोखून धरली. प्रवाशांकडून वारंवार तक्रार करूनही रेल्वे प्रशासनाकडून त्यास दाद दिली जात नसल्याने या डब्यातील प्रवाशांनी तीन वेळा चेन ओढून गाडी थांबविली. पुणे-मुंबई प्रवास करणारा नोकरदार वर्ग, व्यापारी तसेच दैनंदिन कामानिमित्ताने मुंबईला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या गाडीला सुमारे १८ डबे आहेत. त्यात पाच डबे वातानुकूलित असून, २ एसी डबे पासधारकांसाठी तर ३ डबे आरक्षित आहेत. ही गाडी सायंकाळी ५ वाजून १0 मिनिटांनी सीएसटी वरून सुटते. तर पुण्यात रात्री ८ वाजून ३0 मिनिटांनी पोहचते. सायंकाळी ही गाडी स्टेशनवर येताच एका एसी बोगीतील वातानुकूलित यंत्रणा बंद होती. त्यामुळे एका प्रवाशाने चेन ओढली. त्यानंतर पुन्हा गाडी सुरू होताच दोन वेळा चेन ओढण्यात आली. इतर प्रवाशांनी गोंधळ घातला. त्यानंतर सुमारे ३५ ते ४0 मिनिटांनी गाडी पुण्याकडे रवाना झाली. दरम्यान, मुंबईहून गाडी उशिरा निघाल्याने पुण्यातही ती अर्धा ते पाऊण तास उशिरा पोहोचणार असल्याने त्यानंतर येणाऱ्या इतर गाड्यांच्या वेळेत बदल होणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.ही गाडी सकाळी मुंबईत पोहोचल्यानंतर वातानुकूलित यंत्रणेसाठी असलेल्या डब्यातील बॅटरी चार्ज करणे ही रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यानुसार, प्रत्येक डब्याला एक अटेंडंट नेमण्यात आलेला असतो. त्यांनी आपल्या आपल्या डब्याची जबाबदारी घेणे आवश्यक आहे. त्यातच उकाड्याने प्रवासी हैराण असल्याने एसी सुरू असणे आवश्यक आहे. मात्र, प्रशासनाकडून त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत असून, प्रशासनाने संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक आहे.- हर्षा शहा (रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा)