शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून लुबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:29 IST

पुणे : मुळगावी जाण्यासाठी गाडी शोधत असताना सराईत गुन्हेगारांनी कोयत्याचा धाक दाखवून हाताने मारहाण करुन प्रवाशाला लुबाडले. सुरक्षा रक्षक ...

पुणे : मुळगावी जाण्यासाठी गाडी शोधत असताना सराईत गुन्हेगारांनी कोयत्याचा धाक दाखवून हाताने मारहाण करुन प्रवाशाला लुबाडले. सुरक्षा रक्षक व गाडीचालकांना शस्त्राचा धाक दाखवून मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांना मार्केटयार्ड पोलिसांनी अटक केली आहे.

योगेश गुजले आणि बबलु थोरात (रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. चांगा ऊर्फ शाहरुख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अभिजित खंडागळे (वय २५, रा. आंबेगाव पठार) यांनी फिर्याद दिली आहे.

खंडागळे हे मार्केटयार्ड येथील गेट नं. ४ येथे गावी जाण्यासाठी सोमवारी सकाळी गाडी शोधत होते. यावेळी योगे, बबलु व चांगा हे हातात कोयता, चॉपर व राॅड घेऊन तेथे आले. त्यांनी खंडागळे यांना शस्त्राचा धाक दाखवून हाताने मारहाण केली. त्यांच्याकडील मोबाईल जबरदस्तीने चोरला. गेटवरील सुरक्षा रक्षक व इतर गाडीचालकांना शस्त्राचा धाक दाखवून मारण्याची धमकी देऊन लुबाडण्याचा प्रयत्न करत होते. ही माहिती समजल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांना अटक केली. योगेश आणि चांगा हे दोघे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

............

हातातील सोन्याची पाटली लांबविली

पुणे : सासवड ते स्वारगेट या मार्गावर पीएमपी बसने प्रवास करून स्वारगेट बस स्थानक परिसरात उतरत असताना चोरट्याने महिलेच्या हातातील ५० हजार रुपयांची सोन्याची पाटली लंपास केली. याप्रकरणी एका ६५ वर्षाच्या महिलेने स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.