शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

प्रवाशांना लुटणारे रिक्षाचालक अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 03:11 IST

शहरात बाहेरगावहून येणाºया जाणाºया प्रवाशांना भाडेतत्त्वावर बसवून घेत आडबाजूला नेऊन जबरदस्तीने लुटमार करणाºया दोन रिक्षाचालकांना युनिट ५ कडील पोलिसांनी जेरबंद केले.

पुणे : शहरात बाहेरगावहून येणाºया जाणाºया प्रवाशांना भाडेतत्त्वावर बसवून घेत आडबाजूला नेऊन जबरदस्तीने लुटमार करणाºया दोन रिक्षाचालकांना युनिट ५ कडील पोलिसांनी जेरबंद केले. प्रवाशांकडून लुटमार केलेली २५०० रुपयांची रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा १ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.विकास शंकर धोत्रे (वय ३५, रा. ५७0 आंबेडकरनगर, मार्केट यार्ड) आणि संदीप रामदास आरू (वय ४६, रा. खोपकर चाळ, वनराई कॉलनी वीर सावरकर चौक, धनकवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरतन नायक व त्यांचा आतेभाऊ काळू आपल्या मूळगावी राजस्थान येथे जाण्यासाठी कोल्हापूर ते स्वारगेट एसटी बसने येऊन स्वारगेट बसस्टँड येथे दुपारी १.३0 वाजता पोहोचले. तीन वाजता त्यांची पुणे-जयपूर अशी टेÑन असल्याने पुणे रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी वाट पाहत थांबले होते. बाहेर उभ्या असलेल्या रिक्षाचालकाने त्यांना रिक्षात बसवले. काही अंतर गेल्यावर प्रवाशांना खाली उतरून इथून पुणे स्टेशनला जाण्यास सांगितले. आम्हाला स्टेशनला जायचे आहे इथे रेल्वे दिसत नाही, असे म्हटल्यावर त्यांनी दोन्ही प्रवाशांना शिवीगाळ आणि मारहाण केली. गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने ही घटना पाहिल्यानंतर काय प्रकार आहे असे विचारले असता प्रवाशांनी झालेल्या प्रकाराबाबत तक्रार केल्याने दोघा रिक्षाचालकांना ताब्यात घेण्यात आले. गेल्या वर्षभरात बाहेरून येणाºया व जाणाºया प्रवाशांना स्वारगेट, पुणे स्टेशन व शिवाजीनगर भागात लुटले असल्याची कबुली त्यांनी दिली. अशा प्रकारे लुटमार झालेल्या प्रवाशांनी पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.