शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खानापूरमधील बंगल्यात पार्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कठोर निर्बंध लागू असताना सिंहगड परिसरातील खानापूर गावात एका बंगल्यात सुरू असलेल्या पार्टीवर पोलिसांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कठोर निर्बंध लागू असताना सिंहगड परिसरातील खानापूर गावात एका बंगल्यात सुरू असलेल्या पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. बंगल्यात नाचगाणी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.

याप्रकरणी वैभव राजू खिरीड (रा. गोऱ्हे बुद्रुक, ता. हवेली), अनिल गुलाब मते, सागर भरत मते, स्वप्निल राजाराम मते (तिघे रा. खडकवासला, ता. हवेली), रोहन बाळासाहेब गबदुले (रा. किरकिटवाडी, ता. हवेली), अनिकेत अशोक भोसले (रा. गौरव रेसिडन्सी, मानाजीनगर, नऱ्हे, सिंहगड रस्ता), दत्तात्रय बाजीराव जाधव (रा. खानापूर, ता. हवेली) यांच्यासह चार महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खानापूर परिसरातील एका बंगल्यात पहाटे नाचगाणे सुरू होते. ध्वनिवर्धकावरील गीतांचा आवाजामुळे नागरिकांना त्रास होत होता. याबाबतची माहिती पहाटे साडेचारच्या सुमारास ग्रामीण पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मिळाली.

त्यानंतर हवेली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार प्रदीप नांदे, दिलीप शिंदे, गृहरक्षक दलातील जवान निवंगुणे, धुमाळ आदींनी तेथे छापा टाकला. पोलीस असल्याची चाहूल लागताच बंगल्यात असलेले खिरीड, मते, भोसले, जाधव, गबदुले पसार झाले. पोलिसांनी चार महिलांना ताब्यात घेतले आणि चौकशी केली. चौकशीत महिलांनी आरोपींनी आम्हाला पार्टीत गाणी म्हणण्यासाठी बंगल्यात बोलावले होते, अशी माहिती पोलिसांना दिली. आदेश धुडकावणे, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायद्यान्वये अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---