शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हवेलीत उमेदवारी निश्चित करताना पक्षांची दमछाक

By admin | Updated: February 7, 2017 02:52 IST

हवेली तालुक्यातील जिल्हा परिषदेचे १३ गट व पंचायत समितीचे २६ गणांच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील जिल्हा परिषदेचे १३ गट व पंचायत समितीचे २६ गणांच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस त्यामुळे सर्वच पक्षांचे राजकीय नेते, इच्छुक उमेदवार व कार्यकर्ते यांच्या अभूतपूर्व गर्दीमुळे शिवाजीनगर पुणे येथील शासकीय गोदाम आवाराला जत्रेचे स्वरूप आले होते. हवेली निवडणूक निर्णय अधिकारी शहाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार : आज १३ जिल्हा परिषद गटांसाठी १०२, तर पंचायत समिती गणांसाठी २१५ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने एकूण अर्जाची संख्या १५३ व २९० झाली आहे.उमेदवार निश्चित करताना नेत्यांची दमछाक होताना दिसत होती. आपल्या पक्षाच्या उमेदवाराला धोका पोहोचू नये, म्हणून बंडखोर अथवा अपक्ष उमेदवारांना ते विनंती करताना दिसत होते. प्रसंगी एखाद्या पदाचे आमिष दाखवून त्यांना अर्ज जमा न करण्याची नीतीही काही जणांनी अवलंबली. काहींनी साम, दाम, दंड, भेद याचाही अवलंब केला. युती व आघाडीचे सूत न जुळल्याने सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांना रिंगणात उतरवल्याने नवख्या इच्छुकांना संधी मिळाली. त्यांमुळे त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. याऊलट पक्षाशी निष्ठावंत असलेल्या कार्यकर्त्यांना डावलले गेल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर दिसला. कारण गेल्या पाच वर्षांपासून त्यांनी आपल्या पक्षाशी निष्ठा राखून मिळेल ती जबाबदारी पार पाडली; परंतु त्याचा विचार न करता ज्यांनी पक्षांतर केले त्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांच्याकडून पक्षनिष्ठा म्हणून प्रामाणिकपणे काम केले जाईल का? का ते भाऊबंदकी मैत्रीपूर्ण संबंध, नातीगोती यांना प्राधान्य देऊन विरोधकांना मदत करतील, अशा चर्चा गोडाऊन परिसरात रंगल्या होत्या. उमेदवारी आपल्यालाच मिळणार, या हेतूने ज्यांनी गेल्या काही दिवसांपासून निवडून येण्यासाठी मोर्चेंबांधणी केली होती, मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या, परंतु ऐनवेळी त्यांना डावलले गेल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे. आज मांजरी - शेवाळवाडी गटांत राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने मांजरी बुद्रुकचे माजी सरपंच पुरुषोत्तम धारवाडकर यांनी शिवसेनेकडून अर्ज दाखल केला. कदमवाकवस्ती गणांतील राष्ट्रवादीचे अनिल टिळेकर यांनी गेल्या एक महिन्यापासून प्रचारास सुरुवात केली होती. त्यांना डावलल्याने त्यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्या रोहिणी राऊत यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्या आता गंगानगर फुरसुंगी गणांतून राष्ट्रवादी काँग्रेसने एबी फॉर्मसह उमेदवारी दिल्याने त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटांवर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.