शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

मुळशीत उमेदवारी ठरविताना पक्षांची दमछाक

By admin | Updated: February 4, 2017 03:59 IST

मुळशी पंचायत समितीच्या ६ गण व ३ गटांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आपले सर्व जागांवरचे उमेदवार निश्चित केले असल्याचे तालुकाध्यक्ष गंगाराम

पौड : मुळशी पंचायत समितीच्या ६ गण व ३ गटांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आपले सर्व जागांवरचे उमेदवार निश्चित केले असल्याचे तालुकाध्यक्ष गंगाराम मातेरे यांनी सांगितले. दरम्यान, माण-हिंजवडी या सर्वसाधारण गटातून शिवाजी बुचडे यांची उमेदवारी जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी जाहीर केली आहे.अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवशी आज (दि. ३) काँग्रेसकडून गणासाठीच्या ३ व गटासाठीच्या एका उमेदवाराने आपले उमेदवारी अर्ज निवडणूक कक्षात दाखलही केले असून एबी फॉर्म दाखल करण्याचे बाकी ठेवले आहेत.माण हिंजवडी - गट राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी या वेळी माण-हिंजवडी हा एकमेव गट खुल्या प्रवर्गासाठी सुटलेला असून येथून राष्ट्रवादीकडून विद्यमान जि. प. सदस्या स्वाती हुलावळे यांचे पती सुरेश हुलावळे व विद्यमान उपसभापती सारिका मांडेकर यांचे पती व राष्ट्रवादीचे माजी मुळशी तालुकाध्यक्ष शंकर मांडेकर दोघे जण प्रबळ दावेदार आहेत. गेली अनेक वर्षे दोघेही राष्ट्रवादी पक्षाचे निष्ठावान व तितकेच अनुभवी कार्यकर्ते असल्याने दोघांपैकी पक्षश्रेष्ठी कोणाला संधी देणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. शिवसेनेकडून बाळासाहेब चांदेरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.काँग्रेस पक्षाने तालुक्यातील अन्य जागांचे उमेदवार निश्चित करण्याबरोबरच या गटासाठी शिवाजी बुचुडे यांची उमेदवारी बरीच अगोदर जाहीर केल्याने त्यांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे. याच गटातील माण गणातून काँग्रेसकडून सुरेश पारखी यांचेही नाव निश्चित केले असल्याचे सांगितले जात आहे. जि. प.साठी सेनेकडून मच्छिंद्र ओझरकर इच्छुक आहेत. त्याशिवाय माण गणातून शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश भेगडे स्वत: रिंगणात उतरले आहेत.कासार आंबोली गणात उमेदवारीसाठी चुरस कासार-आंबोली हा खुल्या वर्गासाठी राखीव गण असल्याने या गणात भाजपाकडून ४ व शिवसेनेकडून सुरुवातीपासून २१ जणांनी इच्छा व्यक्त केली असून अंतिम टप्प्यात ११ जण आपल्यालाच उमेदवारी मिळायला हवी, याकरिता प्रयत्नात आहेत. यातील काही जण तर आपल्याला संधी न मिळाल्यास बंडखोरी करून अपक्ष लढण्याच्याही तयारीत आहेत. त्यामुळे मूळशीत शिवसेना पक्षाच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्षांतर्गत असणारी ही बंडाळी शमविण्यात जिल्हास्तरावरील कार्यकर्त्यांना अपयश येत असल्याने थेट मातोश्रीवरून दूत पाठविण्याची वेळ कासार आंबोली गणाने आणली आहे. या गणात सर्वांना शांत करून कोणा एकाला उमेदवारी देऊन त्याचा प्रचार अन्य सर्वांनी करावा, याकरिता समन्वय बैठका घेऊन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची दमछाक होताना दिसत आहे. राष्ट्रवादीकडून कोणाला कोळवण खोऱ्याला संधी मिळणार का, गणाच्या पश्चिम पट्ट्याला संधी दिली जाणार, हे अजून तरी गुलदस्त्यात आहे. भाजपाकडून जुने विरुद्ध पक्षात नव्याने आलेले उमेदवार या मुद्याच्या आधारे उमेदवारीसाठी चुरस आहे. विशेष म्हणजे या गणातील एकट्या शिंदेवाडीतून शिंदे आडनावाचे ४ व अन्य गावांतून १ असे पाच उमेदवार चार पक्षाकडून इच्छुक आहेत. (वार्ताहर)