शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
4
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
5
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
6
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
7
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
8
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
9
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
10
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
11
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
12
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
13
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
14
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
15
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
16
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
17
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
18
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
19
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
20
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...

पारव्यांच्या जीवाला गैरसमजांमुळे फास

By admin | Updated: February 24, 2015 01:27 IST

शांतिदूत समजल्या जाणाऱ्या पारवा या पक्ष्याबाबतच्या समज-गैरसमजामुळे त्यांची घरटी उद्ध्वस्त केले जाण्याचे प्रकार पिंपरी-चिंचवड

अंकुश जगताप, पिंपरीशांतिदूत समजल्या जाणाऱ्या पारवा या पक्ष्याबाबतच्या समज-गैरसमजामुळे त्यांची घरटी उद्ध्वस्त केले जाण्याचे प्रकार पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. तसेच, पारव्यामध्ये दमा हा आजार कमी करण्याचे गुणधर्म असल्याच्या वावड्यांमुळे लगतच्या ग्रामीण भागात त्यांची शिकार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पारव्यांच्या जतनासाठी हे प्रकार रोखण्याची गरज पक्षिप्रेमींमधून व्यक्त होत आहे. शहरामध्ये सध्या कासारवाडी येथे पारव्यांचे सर्वाधिक थवे दिसून येतात. याचबरोबर सांगवी, भोसरी, निगडी, प्राधिकरण, चिंचवड, पिंपरीसह शहरभरातील इमारतींवर घरटी करून राहणाऱ्या पारव्यांचे प्रमाण विखुरलेले आहे. मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध होत असल्याने बरीच वर्षे या पक्ष्यांची संख्या वाढत राहिली. मात्र मागील काही वर्षांमध्ये या पक्ष्यामुळे आजार पसरण्याबाबत असणाऱ्या गैरसमजांमुळे विशेषत: बड्या गृहप्रकल्पांमधील, तसेच, उच्चभ्रू वसाहतींमधील नागरिकांमधून या पक्ष्याबाबत तिटकाऱ्याची भावना वाढत असल्याचा प्रत्यय येतो. त्यामुळे आपल्या सदनिकेच्या सज्जातील, खिडकीवरील सिमेंटच्या झरोक्यावर तसेच, छतावरील एखाद्या कोपऱ्यात पारव्याचे घरटे दिसल्यास ते काढून टाकण्याचा सपाटाच लावला जात आहे. काही घरट्यांमध्ये अंडी अथवा पिले दिसल्यावरही ती एखाद्या कामगाराकरवी काढून टाकण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे शहरात शांतिदूताचे जगणेच अशांत झाले आहे. दुसरीकडे पारव्यामध्ये दमा कमी करण्याचे औषधी गुणधर्म असल्याच्या वावड्या काही जणांकडून उठविल्या जात आहेत. त्यांच्याकडूनच पारव्यांची शिकार करून औषध लोकांना विकण्याचे प्रकार सुरू आहेत. काहीजण पारव्याचीच शिकार करून आहारासाठी वापर करीत आहेत. शहरालगतच्या मोशी, चिखली, किवळे, पुनावळे, हिंजवडी, चांदखेड या परिसरात शेतामध्ये चारा खाण्यास उतरणाऱ्या पारव्यांची मोठ्या प्रमाणात शिकार केली जात आहे.