शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाहनतळ धोरण पुन्हा बासनात, महिनाभरासाठी पुढे ढकलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:23 IST

महापालिका आयुक्तांकडून मंजुरीसाठी आग्रह होत असलेले वाहनतळ धोरण स्थायी समितीने सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या दबावामुळे महिनाभर लांबणीवर टाकले आहे. अभ्यासासाठी म्हणून असा निर्णय घेतला असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी सांगितले.

पुणे : महापालिका आयुक्तांकडून मंजुरीसाठी आग्रह होत असलेले वाहनतळ धोरण स्थायी समितीने सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या दबावामुळे महिनाभर लांबणीवर टाकले आहे. अभ्यासासाठी म्हणून असा निर्णय घेतला असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी सांगितले. भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी या धोरणाला विरोध करीत सर्वसामान्यांना त्रास होऊ देणार नाही असे जाहीर केले होते.महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी काही खासगी संस्थांच्या साह्याने हे धोरण तयार केले आहे. त्यात शहरातील विविध रस्त्यांवरील वाहनांचे प्रमाण, तेथील वाहनतळाची व्यवस्था याचा बारकाईने विचार करण्यात आला आहे. त्यातील दुचाकींसाठी ठरवलेला दर जास्त असल्याची टीका होत आहे. तरीही या धोरणाला मंजुरी द्यावी व त्याची त्वरित अंमलबजावणी सुरू व्हावी, असा आयुक्तांसह काही संस्थांचा आग्रह आहे.मात्र, भाजपाचे शहराध्यक्ष गोगावले यांनी महापालिकेतील सत्तेच्या वर्षपूर्तीनिमित्त बोलताना दुचाकीधारकांना जाचक ठरेल असा निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे स्थायी समितीत आज प्रशासनाचा हा प्रस्ताव अभ्यासासाठी म्हणून महिनाभर पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वीही दोन वेळा हाच प्रस्ताव पुढे ढकलण्यात आला आहे.>या धोरणाची विविध घटक संबंधित आहेत. त्यांच्यावर याचा काय परिणाम होईल याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्याविषयी जाणून घेतल्यानंतरच या प्रस्तावाचा विचार करण्यात येईल.- योगेश मुळीक,अध्यक्ष, स्थायी समिती