शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंगचा बोजवारा

By admin | Updated: July 3, 2014 05:48 IST

चिंचवड परिसरामध्ये वाहनतळ, पार्किंग व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. पदपथावरच बिनदिक्कतपणे वाहने लावली जातात.

पराग कुंकुलोळ, चिंचवडचिंचवड परिसरामध्ये वाहनतळ, पार्किंग व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. पदपथावरच बिनदिक्कतपणे वाहने लावली जातात. दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी आवश्यक असलेल्या वाहनतळांचे सुयोग्य नियोजन केलेले नाही, त्यामुळे वाहनपार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी वाहतूकशाखा, महापालिका व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय उदासीन आहे. चिंचवड परिसराचा ज्या गतीने विकास होत आहे. त्याच गतीने वाहनसंख्याही वाढत आहे. या वाढत्या वाहनांमुळे परिसरात होणारी वाहतूककोंडी व प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. वाहतूक शाखा याबाबत योग्य नियोजन व कारवाई करत नाही हे दुर्दैव आहे.सार्वजनिक ठिकाणी व राहत्या घराच्या आवारात पार्किंग आवश्यक असते. महापालिकेच्या बेजबाबदार धोरणांमुळे व प्रशासनाच्या अनास्थेमुळे पार्किंगचा बट्ट्याबोळ उडाला आहे. काही ठराविक सोसायटीचा अपवाद सोडला तर चिंचवड परिसरात वाहने रस्त्यावर अस्ताव्यस्त उभी असतात. मुळातच वाहतुकीसाठी अपुरे पडणारे रस्ते आणि अरुंद होऊन वाहतुकीचा खोळंबा होतो. त्यात वेळ, इंधन व पैशांचाही अपव्यय होतो.रस्त्यावरच वाहने उभीलाखो रुपये मोजूनही सोसायटी भागात पार्किंगसाठी जागा मिळत नाही. यामुळे रस्त्यावर वाहने उभी केली जातात, यामुळे अनेकदा वादविवादाच्या घटना घडतात. मंगल कार्यालये, सभागृहे, बँका सरकारी कार्यालये, रुग्णालय या भागात रहदारीचा ओघ अधिक असतो. परंतु, अशा ठिकाणी पुरेशी पार्किंग व्यवस्था नसल्याने अडचणी निर्माण होतात.चिंचवड गावातील अत्यंत रहदारीचा असणाऱ्या चापेकर चौकात पार्किंगचा बोजवारा उडाला आहे. उड्डाणपुलाखाली नो पार्किंगचे फलक लावले आहेत. मात्र, वाहतूक नियमांची पायमल्ली करत वाहनचालक याच ठिकाणी आपली वाहने उभी करत आहेत. परिसरात नामांकित व्यावसायिकांची दुकाने, बँका व भाजी मंडई असल्याने या भागात नागरिकांची मोठी वर्दळ असते. परंतु या ठिकाणी वाहन पार्किंगचे नियोजन नसल्याने बेशिस्तपणे वाहने उभी असतात. चापेकर चौकातून थेरगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर उड्डाणपुलाखाली व रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी असल्याने वाहतूक कोंडी नित्याची समस्या बनली आहे. शांतीबन सोसायटीसमोर असणाऱ्या पादचारी मार्गावरही दुचाकी पार्किंग केल्या जातात, यामुळे पादचाऱ्यांचा हक्काचा असणारा हा रस्ता बंद असतो. पादचाऱ्यांना या भागातून मुख्य रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन चालावे लागते. या भागात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यापूर्वी या भागात झालेल्या अपघातात एका महिलेला प्राण गमवावे लागले आहे. तर अनेक वाहनचालक व विद्यार्थी जखमी झाले आहेत.वाहन तळांवर अतिक्रमणेरस्त्याच्या दुतर्फा हातगाडीवाल्यांचे अतिक्रमण व वाहनतळ असल्याप्रमाणे उभी केली जाणारे वाहने नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहेत. येथे रस्ता दुभाजकाची उंची कमी असल्याने वाहने रस्तादुभाजकाच्या मधे उभी केली जातात. गांधीपेठ, पडवळआळी, मोरया गोसावी मंदिर परिसर, भोई आळी या भागात अरुंद रस्ते आहेत. मात्र, पार्किंग व्यवस्था नसल्याने नागरिक रस्त्यावर वाहने उभी करतात, यामुळे वाहतूक समस्या गंभीर झाली आहे. कै. शहिद अशोक कामठे बसस्थानक परिसरातही वाहन पार्किंग स्थिती गंभीर आहे. लिंकरोडवरील तानाजीनगर भागात रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी असतात. हेअरटेज प्लाझा इमारतीसमोर दुचाकी व चारचाकी वाहनांमुळे रस्ता अरुंद होतो. परिसरात वर्दळ असल्याने याचा परिणाम वाहतूककोंडीवर होतो. तानाजीनगर, केशवनगर व काकडेपार्क परिसरात अंतर्गत रस्त्यांवर उभी असणारी वाहने धोकादायक ठरतात. काकडेपार्कमधील मुख्य चौकात हातगाडीवाले व पथारीवाले रस्ता गिळंकृत करीत असल्याने अडचणी येतात.पार्किंग सोय नसल्याने गैैरसोयसंतोषनगरात लोकमान्य हॉस्पिटलसमोर वाहने रस्त्याच्या दुतर्फा उभी असतात. हॉस्पिटलसाठी पुरेसे पार्किंग नसल्याने या भागात रस्ता उभ्या वाहनांनी रोखला जातो. वाहतूक शाखेने पाहणी करून येथील वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी आहे. अहिंसा चौक हा चिंचवडमधील धोकादायक चौक अशी ओळख झालेला चौक आहे. या चौकात वाहतूक पोलीस असतात. मात्र, ते येथील वाहतूककोंडी सोडविण्याचा त्रास घेत नाही. परिसरातील अस्ताव्यस्त उभी असणारी वाहने हटविण्यापेक्षा वाहनचालकांकडून दंडवसूल करण्यात व्यस्त असतात. सायंकाळी या रस्त्यावर वाहतूक कोंडीवाहतूककोंडी ही मुख्य समस्या आहे. वाहतूक शाखेच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या एसकेएफ हौसिंग सोसायटी समोरील मार्गावर परिस्थिती गंभीर आहे. या रस्त्यावर सहायक दुय्यम निबंधक कार्यालय आहे. हॉटेल व्यावसायिक व इतर कार्यालयेही मोठ्या प्रमाणावर आहेत.येथे ‘नो पार्किंग’चे फलक लावले होते. मात्र, ते काही व्यावसायिकांनी पुसून टाकल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. वाहतूक शाखेचे कर्मचारी मात्र या भागात जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप रहिवासी करतात.पुणे-मुंबई महामार्गावर चिंचवड स्टेशन परिसरात अनेक वाहने मुख्य रस्ता व पादचारी मार्गावर उभी असतात. या भागात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांचे वर्चस्व आहे. ही मंडळी मनमानी पद्धतीने वाहने रस्त्यावर उभी करतात. यापूर्वी या भागात वाहतूक शाखेचे कर्मचारी वारंवार कारवाई करीत होते. सध्या या भागात पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने वाहतूक समस्या गंभीर आहे.याच रस्त्यावरील श्री शिवाजी महाराज चौकात ‘नो पार्किंग झोन लावण्यात आला आहे. मात्र, याच फलकासमोर अवैध वाहतूक करणारी वाहने बिनधास्तपणे लावली जातात. रस्त्याच्याकडेला असणाऱ्या हातगाड्या व व्यावसायिकांनी थाटलेली दुकाने वाहतुकीस अडथळा निर्माण करतात. मुंबई-पुणे मार्गावरील काळभोरनगर परिसरात हायवे टॉवर व जय टॉवर या इमारतींसमोर परिस्थिती अपघातास पोषक आहे. या भागात पार्किंग झोन देण्यात आला आहे. मात्र, चारचाकी वाहने मुख्य रस्त्यावर उभी असतात.