शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंग शुल्क अन्यायी

By admin | Updated: August 26, 2014 04:55 IST

विद्यार्थ्यांकडून मिळेल त्या मार्गाने शुल्क आकारून शहरातील काही महाविद्यालये नफेखोरी करत आहेत. महाविद्यालयाचा कर्मचारी व विद्यार्थी हे दोघेही महाविद्यालयाचेच असतात.

पुणे : विद्यार्थ्यांकडून मिळेल त्या मार्गाने शुल्क आकारून शहरातील काही महाविद्यालये नफेखोरी करत आहेत. महाविद्यालयाचा कर्मचारी व विद्यार्थी हे दोघेही महाविद्यालयाचेच असतात. परंतु, कर्मचाऱ्यांसाठी मोफत पार्किंग उपलब्ध करून देताना विद्यार्थ्यांबाबत मात्र दुजाभाव होताना दिसत आहे. तसेच, महाविद्यालयांमधील पार्किंग शुल्कासाठी नियमावली तयार करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. परंतु, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न शहरातील बहुतांश सर्वच नामांकित महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना दररोज पार्किंगचे पैसे मोजावे लागतात. विनाअनुदानित अभ्यासक्रमांचे शुल्क सर्वसामान्य विद्यार्थ्यांना न परवडणारे आहे. तसेच विद्यार्थ्यांकडून इतर शुल्काच्या नावाखाली अधिकाधिक शुल्क वसूल करण्याचा प्रयत्न महाविद्यालयांकडून केला जातो. त्यात महाविद्यालयाचे पार्किंग ठेकेदाराला चालविण्यासाठी दिले जाते. पार्किंगचे शुल्क वसुलीसाठी काही ठेकेदारांकडून ‘टग्यां’ची नेमणूक करतात. त्यामुळे महाविद्यालयाच्या पार्किंगचे कंत्राट देताना पोलिसांची मदत घेणे गरजेचे आहे. पोलिसांकडून कंत्राटदाराची व पार्किंगचे पैसे वसूल करणाऱ्या कामगारांची तपासणी करूनच कंत्राट देण्याचा निर्णय महाविद्यालयांनी घ्यायला हवा. पार्किंगचे शुल्क वसूल करणाऱ्या टग्यांकडून विद्यार्थी व विद्यार्थिनींना अरेरावीची भाषा वापरली जाते. काही वेळा पार्किंगमधील गाडी पंक्चर केली जाते किंवा गाड्यांची मोडतोडही होते. परंतु, त्याची नुकसानभरपाई मिळत नाही. त्यामुळे पार्किंगसाठी पैसे का मोजावेत, असा सवालही विद्यार्थ्यांकडून उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)