पुणो : गणोश विसजर्न मिरवणुक निघणा-या लक्ष्मी रस्ता, केळकर, कुमठेकर, टिळक, शास्त्री रस्त्यांसह त्यांना जोडणा-या उपरस्त्यांच्या 1क्क् मिटर परिसरात पार्किंगला बंदी करण्यात आली आहे. या आदेशामधून पोलीस, अग्निशामक दल, रुग्णवाहीका आणि एमएसईबीच्या वाहनांना वगळण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग आवाड यांनी दिली.
शहरातील शिवाजी रस्त्यावरील काकासाहेब गाडगीळ पुतळा ते जेधे चौक, संपुर्ण लक्ष्मी रस्ता, संपुर्ण टिळक रस्ता, सोन्या मारुती चौक ते फ डके हौद चौकादरम्यान वाहतूक बंद राहणार आहे. यासोबतच बाजीराव रस्त्यावरील सारसबागेपासून फुटक्या बुरुजार्पयत, गणोश रस्त्यावरील दारुवाला पुल ते जिजामाता चौक, केळकर रस्त्यावरील बुधवार चौक ते टिळक चौक, गुरु
नानक रस्त्यावरील देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक ते गोविंद हलवाई चौकादरम्यानही बंदी करण्यात आली आहे.
तसेच कर्वे रस्ता, शास्त्री रस्ता, जंगली महाराज रस्ता, फर्गसन रस्ता आणि भांडारकर रस्ताही आवश्यकतेप्रमाणो दुपारी चारनंतर मिरवणुक संपेपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असल्याचे आवाड यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
नागरिकांसाठी एकेरी पादचारी मार्ग
च्गणोस विसजर्न मिरवणुक पाहण्यासाठी येणा-या नागरिकांना मिरवणुक पाहणो सोयीचे व्हावे या करीता एकेरी पादचारी मार्ग करण्यात आले आहेत.
च्शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्त्यावरील गाडगीळ पुतळ्यापासून जिजामाता चौक, गणोश रस्त्याने फडके चौकाकडून उजवीकडे वळून मोती चौकातून सरळ सोन्याची मारुती चौकात यावे. येथून उजवीकडे वळून सरळ बेलबाग चौक ते सेवासदन चौकातून सरळ लक्ष्मी रस्त्याने टिळक चौकाकडे फक्त जाण्यासाठी मार्ग नेमण्यात आला आहे. टिळक चौकाकडून बेलबाग चौकाकडे येण्यास बंदी करण्यात आली आहे.