शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

गणवेशासाठी पालकांना भुर्दंड

By admin | Updated: May 11, 2017 04:24 IST

जिल्हा परिषद शाळांतील सामजिक व आर्थिक मागासलेल्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मोफत गणवेशाची रक्कम आता थेट

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : जिल्हा परिषद शाळांतील सामजिक व आर्थिक मागासलेल्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मोफत गणवेशाची रक्कम आता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याने सध्या या विद्यार्थ्यांची खाती उघडण्यासाठी लगबग सुरू आहे. मात्र बँका झिरो बॅलन्स खाते उघडून देण्यास नकार देत असल्याने चारशेच्या गणवेशासाठी आधीच आर्थिक मागास असलेल्या पालकांना पाचशेचा भुर्दंड पडत आहे. त्यात ४०० रुपयांत दोन गणवेश येत नसल्याने मोठी अडचण झाली आहे.गणवेश खरेदीची पावती दाखवल्यानंतरच ही रक्कम खात्यात जमा होणार असल्याने पालकांना अगोदर गणवेश खरेदी करावा लागणार आहे, त्याची पावती दाखवल्यानंतरच ही रक्कम जमा होणार असल्याने पालक नाराजी व्यक्त करीत आहेत.यापूर्वी शाळा व्यवस्थापनामार्फत या गणवेशाचे वाटप केले जात होते. मात्र त्यांच्याकडून गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी आल्यामुळे शिक्षण विभागाने या शक्ष्ौणिक वर्षापासून ही रक्कम थेट लाभार्थी विद्यार्थ्याच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हा परिषद शाळांतील अनुसूचित जाती जमाती, मागासवर्गीय मुले व सर्व गटातील मुली यांना हा मोफत गणवेश देण्यात येतो. प्रतिविद्यार्थ्यालाएका गणवेशास २०० रुपयाप्रमाणे ४०० रुपये खात्यात जमा होणार आहेत. एकही पात्र विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहू नये, म्हणून शासनाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे पालकांकडून स्वागत करण्यात येत असले तरी येणाऱ्या अडचणींबाबात संतापही व्यक्त होत आहे. शासनाने विद्यार्थ्यांचे खाते हे झिरो बॅलन्सवर काढण्याचे बँकांना आदेश आहेत. असे असले तरी काही बँका याला नकार देत असल्याने विद्यार्थ्यांची अडचण होत आहे.यासंदर्भात उपशिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी शासनाचे यासंदर्भात आम्हाला १० दिवसांपूर्वी पत्र आले आहे. त्यानुसार त्या त्या तालुक्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र काढून सूचना दिल्या आहेत. यासंदर्भात खाते काढण्यासाठी बँका पैैसे मागतात, अशा तक्रारीही आमच्याकडे आल्या होत्या. मात्र आम्ही त्या त्या तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँकांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हा शासनाचा आदेश असून त्यांनीच झिरो बॅलन्स खाते उघडण्याचे आदेश दिल्याचे सांगितले आहे. त्यानंतर तक्रारी कमी झाल्या आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वी लाभार्थी सर्व विद्यार्थ्यांची खाती उघडण्यात येतील. तसेच फक्त गणवेशासाठीच हे खाते नसून इतर योजनांचा निधीही यात वर्ग करण्यात येणार आहे.