शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाबाबत पालकांमध्ये जागृती हवी

By admin | Updated: July 25, 2016 02:18 IST

मुलांना शाळेत घालण्यापासून त्यांनी इंजिनिअर व्हावे, डॉक्टर व्हावे, अशी अपेक्षा केली जाते. मुलांचे करिअर घडविण्यापर्यंत पालकांकडून मुलांना विविध स्पर्धांमध्ये उतरविले जाते.

पुणे : मुलांना शाळेत घालण्यापासून त्यांनी इंजिनिअर व्हावे, डॉक्टर व्हावे, अशी अपेक्षा केली जाते. मुलांचे करिअर घडविण्यापर्यंत पालकांकडून मुलांना विविध स्पर्धांमध्ये उतरविले जाते. मात्र, मुलांना त्यांच्या इच्छेनुसार जगण्याची संधी दिली पाहिजे. यासंदर्भात पालकांमध्येच आता जागृती करण्याची वेळ आली आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त केले. घोकंपट्टीवर आधारित शिक्षण पद्धतीतही मूलभूत बदल करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.डीपर व सर फाऊंडेशनतर्फे दिलीप अरळीकर व सुनीता अरळीकर यांना अवचट यांच्या हस्ते महापालक सन्मान पुरस्काराचे रविवारी वितरण करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी, डॉ. रवींद्र कोल्हे, डीपरचे संस्थापक सचिव हरिष बुटले, सर फाउंडेशनच्या उपाध्यक्षा डॉ. रोहिणी बुटले आदी उपस्थित होते. एक लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.दरम्यान, संस्थेच्या दुसऱ्या सत्रात संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते मेडिकल व इंजिनिअरिंग प्रवेश पूर्व परीक्षेत अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनाही आदर्श संस्थापालक सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डीपर, सर फाऊंडेशन आणि साद माणुसकीची या अभियानांतर्गत सामाजिक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. त्यात ज्येष्ठ समुपदेशक डॉ. श्रीराम गीत, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन, विवेक वेलणकर, रूरल रिलेशन संस्थेचे प्रमुख प्रदीप लोखंडे, हरिष बुटले, सिंहगड अभियांत्रिकी कॉलेजचे प्राचार्य डॉ. विजय वाढई यांनी सहभाग घेतला.(प्रतिनिधी)