कोथरूड : कोथरूड भागातील सामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षण देणारी संस्था म्हणून नावारूपाला आलेल्या एमआयटी विद्यालयाच्या वतीने दर वर्षी केली जाणारी फीवाढ रद्द करण्याची मागणी करत आज पालक संघटनांनी संस्थेच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. या वेळी पालकांनी संस्थेच्या विरोधात घोषणा देऊन फीवाढीचा निषेध नोंदवला.
कोथरूड भागातील सामान्य कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण देणारी संस्था म्हणून एमआयटीमध्ये अनेक पालकांनी आपल्या मुलांचा प्रवेश घेतला असला, तरी या संस्थेच्या ध्येयधोरणात सातत्याने बदल होत असून, संस्थेचे पदाधिकारी व्यावसायिक झाले आहेत. या संस्थेच्या वतीने 2क्क्9मध्ये 8क्क्क् फी घेऊन प्रवेश दिला होता. त्यात हळुवारपणो 2क्14मध्ये तीन पट वाढ केली आहे. संस्थेच्या वतीने प्रवेशाच्या दरम्यान नफा- तोटय़ावर शिक्षकांच्या पगाराची कारणो देऊन शुल्कवाढ केली जात असल्याचाही आरोप पालकांनी केला. आज पालक संघटनांनी शाळेच्या पालक समितीसमोरही फीवाढ रद्द न करण्याची भूमिका घेतल्याने पालक संघटनांनी आक्रमक पवित्र घेतला आहे. या संस्थांवर कारवाई करण्यासाठी शिक्षण महासंचालिका सुमन ¨शंदे यांना भेटणार असल्याचे पालक संघटनांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान व्यवस्थापनाशी झालेल्या चर्चेत पालकांना धमकी दिल्याने ते आक्रमक झाले आहेत. (वार्ताहर)
एमआयटी संस्थेच्या वतीने दर वर्षी अभ्यासेतर उपक्रमांसाठी शिक्षकांना पगार देण्याची कारणो देत शुल्कवाढ केली जाते; परंतु प्रत्यक्षात शिक्षकांची नेमणूक न करताच ही शुल्कवाढ केली जात आहे. सामान्य नागरिकांची ऐपत असल्याने या संस्थेकडे पालक धाव घेत असले, तरी संस्था व्यावसायिक झाली असून, शासकीय करण्याची गरज आहे. त्यामुळे शासनाने त्यांच्यावर कारवाई करावी.
- सुभाष आमले, एमआयटी पालक संघ