शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रसूतीसाठी १०८ सेवा ठरतेय वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 06:17 IST

महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसची डायल १०८ सेवा गर्भवती महिला आणि अर्भकांसाठी वरदान ठरत आहे.

पुणे : महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसची डायल १०८ सेवा गर्भवती महिला आणि अर्भकांसाठी वरदान ठरत आहे. १०८ सेवेच्या रुग्णवाहिकांमध्ये आतापर्यंत राज्यभरातील तब्बल १५,५३६ बालकांनी जम घेतला आहे. रुग्णवाहिकांच्या माध्यमातून तातडीची वैद्यकीय सेवा मिळाल्याने महिलांची सुखरूप प्रसूती झाली आहे. यामध्ये आतापर्यंत पुण्यातील १,००२ बालकांचा समावेश आहे.नाशिकमध्ये या सेवेचा सर्वाधिक लाभ झाला असून तेथील १,०८५ बालकांनी रुग्णवाहिकेमध्ये जन्म घेतला आहे. राज्यातील एकूण ३५ जिल्ह्यांमध्ये ही सेवा असून रुग्णवाहिकेत प्रसूती झालेली आकडेवारी मोठी असल्याचे यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीवरून समोर आले आहे.शासनाने २६ जानेवारी २०१४ रोजी ही तातडीची सेवा सुरू केली होती. तेव्हापासून ३० सप्टेंबरपर्यंत म्हणजे जवळपास २ वर्षांत राज्यभरातून या सेवेला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. विविध आपत्कालीन परिस्थितीमध्ये अडकलेल्यांनी या सेवेला सुरुवातीपासून उत्तम प्रतिसाद दिला आहे. नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत १०८ हा क्रमांक डायल केल्यास विनामूल्य सेवा देणारी सुसज्ज रुग्णवाहिका डॉक्टरांसह हजर होते. यामध्ये अपघात, हृदयविकार, भोवळ येणे, अर्धांगवायू, विषबाधा, आगीने भाजणे अशा अनेक प्रकारच्या आपत्कालीन घटनांचा समावेश होतो.राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने आणि बीव्हीजी इंडिया लिमिटेड या सेवाक्षेत्रातील कंपनीच्या माध्यमातून चालविण्यात येणाºया महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस (डायल १०८) सेवेच्या वतीने अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा ९३७ रुग्णवाहिका या सेवेसाठी राज्याकडे उपलब्ध आहेत. यामध्ये २३३ अ‍ॅडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका असून, ७०४ बेसिक लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका समाविष्ट आहेत.याबाबत महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसचे मुख्य संचालन अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके म्हणाले, ‘‘ग्रामीण भागामध्ये काही वेळा दळणवळणाची साधने उपलब्ध नसल्याने आजही बाळंतपणात होणाºया अपघातांची संख्या जास्त आहे. बाळंतपणाच्या कळा सुरू होणार, असे वाटल्यानंतर गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांनी १०८ सेवेशी संपर्क साधल्यास पुढील त्रास वाचू शकतो. त्यामुळे रुग्णवाहिका बोलावण्यास उशीर न केल्यास गरजू महिलेला वेळेत मदत मिळून मातामृत्यू व अर्भकमृत्यू टाळता येणे शक्य आहे.’’