शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

प. पू. प्रीतिसुधाजी म. सा. यांनी समाजाला सांस्कृतिकदृष्ट्या साक्षर केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 04:09 IST

वाणीभूषण प. पू. प्रीतिसुधाजी म. सा. यांनी समाजाला सांस्कृतिकदृष्ट्या साक्षर केले आहे. समाजामध्ये चेतना निर्माण केली आहे. त्यांनी परंपरा आणि परिवर्तनाची सांगड घातली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : वाणीभूषण प. पू. प्रीतिसुधाजी म. सा. यांनी समाजाला सांस्कृतिकदृष्ट्या साक्षर केले आहे. समाजामध्ये चेतना निर्माण केली आहे. त्यांनी परंपरा आणि परिवर्तनाची सांगड घातली आहे. यामुळे समाज सशक्त बनला आहे, असे मत लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी व्यक्त केले.बिबवेवाडी जैन श्रावक संघाच्यावतीने प. पू. प्रीतिसुधाजी म. सा. यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. त्यावेळी दर्डा बोलत होते. यावेळी माजी मंत्री सुरेश जैन, खासदार दिलीप गांधी, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर, महाव्यवस्थापक मिलन दर्डा आदी उपस्थित होते.दर्डा म्हणाले, ‘जैन तत्वज्ञान विज्ञानवादी आहे. मनुष्य म्हणून जगलात तर महावीर होणे सरल आहे. सर्वांप्रती दया, करुणा, सद्भावना आणि दातृत्वाची वृती असावी. प. पू. प्रीतिसुधाजी म. सा. यांनी ओढलेली साधनेची रेषा आज सद्भावनेचा मार्ग बनली आहे. प्रत्येक धर्मात चातुर्मासाचे महत्व आहे. जीवन जगण्याची शैली चातुर्मास शिकवतो. संतांच्या अंगावरील शुभ्र वस्त्र म्हणजे ज्ञान, ध्यान आणि साधनेचे प्रतीक आहेत. मात्र, आमच्या अंगावरील वस्त्रे ही भटकत्या आस्थेचे प्रतीक आहेत. ही अस्थिरता संतच दूर करू शकतात.’सुरेश जैन म्हणाले, ‘प. पू. प्रीतिसुधाजी म. सा. यांनी विश्वासाठी समता, शांती आणि प्रेमाचा विचार दिला असून त्याचा विश्वामध्ये प्रसार होण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या जळगावमध्ये त्यांच्या झालेल्या प्रवचनाच्या आठवणी आजही ताज्या आहेत.’जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहनलाल चोपडा, राजेश सांकला, माणिकचंद दुगड, प्रा. अशोक पगारीया, विजय भंडारी, विजयकांत कोठारी, प्रफुल कोठारी, विलास राठोड, बाळासाहेब धोका, नरेंद्र सोळंकी, सुमतीलाल कर्नावट, बाबुशेठ बोरा, रामलाल शिंगवी यांची विशेष उपस्थिती होती.