शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
3
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
4
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
5
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
6
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
7
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
8
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
9
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
10
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
11
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
12
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
13
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
14
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
15
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
16
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
17
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
18
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
19
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
20
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!

पोप्या भोसलेने केल्या होत्या सात घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 05:44 IST

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने एका अट्टल चोरट्यास अटक केली आहे. त्याने साथीदारांच्या मतदतीने यवत, शिक्रापूर, शिरूर, लोणी कंदमध्ये धुमाकूळ घातला होता

लोणी काळभोर : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने एका अट्टल चोरट्यास अटक केली आहे. त्याने साथीदारांच्या मतदतीने यवत, शिक्रापूर, शिरूर, लोणी कंदमध्ये धुमाकूळ घातला होता. तब्बल सात घरफोड्या व एक जबरी चोरी त्याने केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.पोप्या ऊर्फ पोपट ऊर्फ गणेश बबन ऊर्फ डबन भोसले (वय २५, रा. आलेगाव पागा, शिरूर, जि. पुणे) असे त्याचे नाव असून त्याच्याकडून ४ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपळे जगताप येथे पडलेल्या दरोड्यात तो फरार होता.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ मार्च रोजी पिंपळे जगताप येथील भंगाराचे दुकानामध्ये ८ ते १० इसमांनी मालक अक्रम खान यास डोक्यात लोखंडी सळीने व चाकूने वार केले. ४ हजार २०० रुपये व मोबाइल घेऊन ते पळून गेले होते. यात दुकान मालक अक्रम ऊर्फ एहसान उल्ला खान मृत झाले होते. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी एका आरोपीस अटक केली होती. गुन्हा घडल्यापासून पोप्या भोसले हा फरार होता. त्यानंतर त्याने त्याचे साथीदार मयूर भरदार काळे (वय २३, रा. जातेगाव, मोरेवस्ती, शिरूर) व इतर दोन साथीदारांच्या मदतीने घरफोड्या करून धुमाकूळ घातला होता. सात घरफोड्या व एक जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक, अप्पर पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, संदीप पखाले,पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश क्षीरसागर, सहायक फौजदार दत्तात्रय गिरमकर, महेश गायकवाड, नीलेश कदम, रौफ इनामदार, विद्याधर निश्चित, रवी शिनगारे, सागर चंद्रशेखर, सचिन गायकवाड, भारत कोळी, समाधान नाईकनवरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.