शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पानसरे समर्थक गोंधळात

By admin | Updated: January 11, 2017 03:12 IST

राष्ट्रवादीचे नेते आझम पानसरे भाजपावासी झाल्याने त्यांच्या समर्थकांची सध्या तळ्यात-मळ्यात अशी स्थिती झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात पानसरे

पिंपरी : राष्ट्रवादीचे नेते आझम पानसरे भाजपावासी झाल्याने त्यांच्या समर्थकांची सध्या तळ्यात-मळ्यात अशी स्थिती झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात पानसरे यांच्या समर्थक नगरसेवकांचा गट आहे. पानसरे यांच्या भरवशावर राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची समर्थकांनी जोरदार तयारी केलेली आहे. मात्र, अचानक त्यांनी भाजपाात प्रवेश केल्यामुळे त्यांची कोंडी झाली आहे. ज्या प्रभागात भाजपाचे देखील इच्छुक उमेदवार आहेत, त्याच ठिकाणी पानसरे यांचेही समर्थक इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, पानसरे यांच्या पाठोपाठ भाजपात प्रवेश केल्यास भाजपाची उमेदवारी मिळणार का, असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. त्यामुळे थांबणे अथवा पानसरे यांच्याबरोबर जाणे यांपैकी काय फायद्याचे ठरेल, अशा द्विधा मन:स्थितीत समर्थक आहेत. जगदीश शेट्टी, ज्ञानेश्वर भालेराव, नीलेश पांढरकर, जावेद शेख, नंदा ताकवणे, तानाजी खाडे, अस्लम शेख, उल्हास शेट्टी, काळुराम पवार हे पानसरे समर्थक मानले जातात.  पानसरे यांच्या प्रवेशापाठोपाठ समर्थकांपैकी काही जणांनी लगेच भाजपाात प्रवेशही केला. मात्र, काही जणांचा विचार सुरू असून, त्यांची तळ्यात-मळ्यात अशी स्थिती आहे. लवकरच आचारसंहिता लागू होणार असून, विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारनिश्चितीची प्रक्रिया सुरूआहे.  अनेक इच्छुकांनी तर प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे.  दरम्यान, पानसरे यांच्या भाजपाा प्रवेशाने राजकीय समीकरणे बदलली असून, पानसरे समर्थकांना ऐनवेळी धावाधाव करावी लागण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी) पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी उद्योगाच्या महापालिका, केंद्र सरकार व राज्य सरकार संबंधित समस्या सोडविण्यासाठी भाजपाामध्ये प्रवेश केल्याची भूमिका मांडली आहे. या समस्यांचे निवारण करण्यासाठी पालकमंत्री, मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून तसेच केंद्र सरकार संदर्भातील समस्यांसाठी केंद्रीय मंत्र्यांसोबत चर्चा करून समस्या सोडविण्याचे आश्वासन स्थानिक भाजपा नेतृत्वाने दिले असल्याचे बेलसरे यांनी म्हटले आहे.