शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
5
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
6
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
7
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
8
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
9
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
10
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
11
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
12
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
13
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
14
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
15
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
16
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
17
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
18
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
19
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
20
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र

पार्किंगसाठी पुणेकरांच्या खिशाला कात्री

By admin | Updated: May 6, 2016 05:56 IST

पार्किंगच्या पावतीवर छापील आकडा २ रुपयांचा मात्र, शिक्का मारून चार रुपयांची वसुली... पार्किंग दुचाकीची मात्र... पावती चारचाकीची आणि रक्कमही चारचाकी वाहनाची... तर पावतीवर

पुणे : पार्किंगच्या पावतीवर छापील आकडा २ रुपयांचा मात्र, शिक्का मारून चार रुपयांची वसुली... पार्किंग दुचाकीची मात्र... पावती चारचाकीची आणि रक्कमही चारचाकी वाहनाची... तर पावतीवर २ रुपये असले तरी तासासाठी ५ रुपये भरावे लागतील अन्यथा गाडी लावू अशी अरेरावी... ही स्थिती आहे महापालिकेच्या शहरातील वाहनतळांची.. एकीकडे बहुतांश रस्त्यांवर वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांकडून नो-पार्किंग केले असतानाच; दुसरीकडे महापालिकेकडून नागरिकांच्या सुविधांसाठी महापालिकेकडूनच उपलब्ध करून देण्यात आलेल्या वाहनतळांच्या ठिकाणी पुणेकरांच्या खिशाला दोन-दोन रुपयांनी कात्री लावून दररोज लाखो रुपयांचा मलिदा या वाहनतळांवर लाटला जात असल्याची धक्कादायक बाब टीम ‘लोकमत’ने शहरात बुधवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आली आहे. विशेष म्हणजे महापालिकेकडून अशा प्रकारे ठेकेदारांकडून पार्किंग शुल्काची जादा वसुली रोखण्यासाठी भरीव दंडाची तरतूद करण्यात आली असून, यासाठी स्वतंत्र नियमावलीही करण्यात आली आहे. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधींचा वरदहस्त आणि बड्या राजकीय मंडळींचा आशीर्वाद असल्याने या ठेकेदारांकडून या नियमावलीला तसेच महापालिकेने ठरवून दिलेल्या पार्किंगच्या शुल्काला हरताळ फासला जात आहे. महापालिकेच्या वाहनतळांमध्ये दुचाकीसाठी प्रतितास २ रुपये तर चारचाकींसाठी ५ रुपयांचा दर निश्चित केला गेलेला असताना; ठेकेदारांकडून दुचाकीसाठी ५ रुपये तर चारचाकीसाठी १० रुपयांची आकारणी केली जात आहे. महापालिकेच्या नाट्यगृहांच्या पार्किंग मध्येही अशाच प्रकारे लूट सुरू असून, दुचाकीसाठी प्रतितीन तास २ रुपये शुल्क आकारणे आवश्यक असताना प्रत्येकी ५ ते १० रुपयांची वसुली केली जात असल्याचे पुरावेच ‘लोकमत’ने उजेडात आणले आहेत. नाट्यरसिकांची सर्वाधिक लूट शहरातील महापालिकेच्या नाट्यगृहांमध्ये येणाऱ्या नाट्य रसिकांची सर्वाधिक लूट होत आहे. बालगंधर्व, गणेश कला क्रीडा मंच, अण्णा भाऊ साठे नाट्यगृह या सर्व ठिकाणी दुचाकी वाहनांना प्रति तीन तासांसाठी २ रुपये, तर चारचाकी वाहनांसाठी तेवढ्याच कालावधीसाठी ५ रुपये शुल्क निश्चित केले आहे. मात्र, प्रत्यक्षात बालगंधर्वमध्ये तासाला ५ रुपये तर भीमसेन जोशी नाट्यगृह आणि अण्णा भाऊ साठे नाट्यगृहांमध्ये प्रत्येकी १० रुपये दुचाकी चालकांकडून घेतले जातात. या पेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे या पावत्यांवर महापालिकेला दाखविण्यासाठी २ रुपये शुल्क छापलेले असून, प्रत्यक्षात पावती जमा करून घेऊन गाडी बाहेर जाताना दहा रुपये घेतले जात असल्यचा अनुभव ‘लोकमत’च्या प्रतिनिधींना आला.पंडित भीमसेन जोशी कलामंदिरात नागरिकांची लूटऔंध येथील पंडित भीमसेन जोशी कलामंदिराच्या इमारतीत पीएमआरडीए सारखी अनेक महत्त्वाची कार्यालय असून, येथे येणाऱ्या नागरिकांची पार्किंगसाठी दोन रुपये घेणे अपेक्षित असताना तब्बल दहा रुपये घेऊन ठेकेदाराकडून सर्रास लूट केली जात आहे. पार्किंच्या गेटवर टोळक्याने असलेल्या ठेकेदारांच्या मुलांकडून येणाऱ्या लोकांना, महिलांना अरेरावीची भाषादेखील वापरली जात असल्याचे येथे आलेल्या काही व्यक्तींनी ‘लोकमत’ला सांगितले.पंडित भीमसेने जोशी कलामंदिराच्या इमारतीमध्ये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि आता नव्याने अन्न आणि औैषध प्रशासन (एफडीए) चे कार्यालय सुरु झाले आहे. त्यामुळे येथे विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची वर्दळ मोठी आहे. जय गणेश एन्टरप्रायजेस यांना येथील पार्किंगचा ठेका दिला असून, महापालिकेच्या वतीने केवळ एका तासासाठी केवळ ५ रुपये घेणे अपेक्षित असताना येथे मात्र तब्बल दहा रुपये घतले जात आहेत. तसेच पार्किंगमध्ये गाड्या लावल्यानंतर गाड्यांमधील पेट्रोल काढून घेणे, गाड्याची हवा सोडणे आदी प्रकारदेखील होत असल्याचे येथे येणाऱ्या काही लोकांनी ‘लोकमत’च्या प्रतिनिधींना सांगितले.पावत्या जुन्या, दर नवीनगजबजलेल्या फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता परिसरात आलेल्या वाहनांच्या पार्किंगसाठी महापालिकेचे शितोळे रस्त्यावर लँडमार्क पार्किंग आहे. या ठिकाणी वाहनचालकांना चक्क दोन रुपये छापलेली पावती देण्यात येत असली तरी प्रत्यक्षात मात्र, एका तासाच्या आत वाहन घेऊन जाताना ५ रुपयांची वसुली केली जाते. विशेष म्हणजे परत जाताना वाहनचालकांची पावती जमा करून घेतली जाते. या वाहनतळावर वाहन लावल्यानंतर पावतीवर केवळ वेळ लिहिली जाते. कोणतेही पैसे घेतले जात नाहीत. त्यानंतर जेव्हा वाहनचालक परत येतो तेव्हा तासांच्या हिशेबानुसार, प्रतितास पाच रुपयाप्रमाणे पैसे घेतले जातात.दुचाकी असताना पावती चारचाकीचीनारायण पेठेतील हरिभाऊ साने वाहनतळ- जागा अर्थातच पालिकेच्या मालकीची, निविदा काढून वाहनतळ एका मंडळाला चालवायला दिलेला, त्यामुळेच पालिकेचे सगळे नियम त्यांना लागू. असे असताना दुचाकी वाहनांसाठी अगदी सर्रासपण ५ रुपये प्रतितास अशी छपाई असलेली पावती दिली जाते. कोणी विचारले तर पावत्या संपल्या असे सांगण्यात येते व ३ रुपये घेतले जातात. म्हणजे १ रुपया जास्तच. जागा भली मोठी, भिंतींवर सूचना वगैरे व्यवस्थित लिहिलेल्या, मात्र व्यवहार त्याप्रमाणे नाही. कोणी विचारणा केली नाही तर ५ रुपयेच घेतले जातात. वाहनतळाच्या जागेत वाहनतळच हवा, मात्र या जागेत एका कोपऱ्यात कॅरम वगैरे ठेवलेले आहेत. तिथे अनेक जण बसलेले असतात. कॅरम बोर्डावर दिव्याची वगैरे सर्व व्यवस्था केलेली आहे.पार्किंगचे दर पावतीवर दिसतच नाहीतमहापालिका प्रशासनाकडून नाट्यगृहांमधील वाहनतळांसाठी प्रति तीन तास २ रुपये तर चारचाकी वाहनांसाठी ५ रुपये निश्चित करण्यात आले आहेत. मात्र, बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारातील पार्किंगमध्ये चक्क प्रतितास ५ रुपयांची वसुली केली जाते. महापालिकेने बंधनकारक करूनही या ठिकाणी कोठेही पार्किंगचे दर वाहनचालकांना दिसतील अशा प्रकारे लावण्यात आलेले नाहीत. तर पावतीवर कोठेही ही रक्कम लिहिण्यात आलेली नाही. किती वेळ गाडी लावली हे पाहण्यासाठी गाडी आत घेऊन जातानाच पाच रुपये घेतले जातत. तर परत जाताना या पावतीवरील वेळ पाहून प्रतितास पाच रुपयांप्रमाणे पैसे वसूल केले जातात. या पावतीवर तारखेचा शिक्का मारलेला असला तरी किती वेळासाठी किती रक्कम आकारली जाईल याचा कोठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे या ठिकाणी प्िरतवाहनामागे तीन रुपयांची लूट राजरोसपणे सुरू आहे. विशेष म्हणजे पार्किंगपासून अवघ्या हाकेच्या अंतरावर बालगंधर्वाच्या व्यवस्थापकांचे कार्यालय असून त्यांनाही या ठिकाणी महापालिकेने निश्चित केलेल्या पार्किंगच्या दराची माहिती आहे. मात्र, त्यानंतरही ठेकेदार संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून प्रत्येक गाडीमागे तीन रुपये जादा आकारले जात आहेत.छापील दर २ रुपये, शिक्का मात्र ४ रुपयांचामहापालिकेच्या डेक्कन जिमखाना वाहनतळावर गाडी पार्किंग करण्यात आल्यानंतर दिल्या जाणाऱ्या पावतीवर प्रतितास २ रुपये आकारण्याचा उल्लेख आहे. मात्र, त्याच ठिकाणी बसलेले कर्मचारी या पावतीवर चक्क चार रुपयांचा शिक्का मारून वसुली करताना दिसून आले. तर एक रुपया सुट्टा नसल्याचे कारण पुढे करत ५ रुपये घेतले जात आहेत. या परिसरातही पावती घ्यावी या नियमासह महापालिकेने बंधनकारक केलेले सर्व नियम ठसठशीत अक्षरात लिहले असले तरी एका तासासाठी दुचाकीला २ रुपये आकारले जातात. याचा साधा नामोल्लेखही कोठेच करण्यात आलेला नाही. तर धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी जागा कमी असल्याचे सांगत गाडीला हॅन्डललॉक लावण्यास या ठिकाणचे कर्मचारी मनाई करतात. पण पावतीवर मात्र, गाडी चोरीस गेल्यास अथवा त्याचे काही नुकसान झाल्यास आमची जबाबदारी नाही असे नमूद करण्यात आले आहे. याबाबत विचारले असता गाडी हॅन्डललॉक करू नका, मात्र जबाबदारी आमची नाही असे उडवाउडवीचे उत्तर देण्यात आले.तक्रार आली तर कारवाई करूपालिकेच्या मालकीचे एकूण ३० वाहनतळ आहेत. दुचाकीसाठी प्रति तास २ रुपये, चारचाकीसाठी ५ रुपये. पालिकेच्या नाट्यगृहांसाठी दुचाकीला प्रतिकार्यक्रम ५ रुपये असा दर आहे. याप्रमाणेच वाहनतळचालकांनी दर घेणे बंधनकारक आहे. या दरात कसलाही बदल केलेला नाही. सर्व वाहनतळांसाठी सारखेच दर आहेत. त्यांनी दरफलक लावायला हवा, तो दर्शनी भागावरच पाहिजे असा नियम आहे. वाहनतळचालकाने त्यांचे पालन करणे अपेक्षित आहे. सर्व वाहनतळांवर नियमांचे पालन होते आहे किंवा नाही हे पाहण्याची जबाबदारी निसंशयपणे पालिकेचीच आहे. मात्र तशी यंत्रणा नाही व ती निर्माण करणे व्यवहार्यही नाही. फसवणूक होत असेल तर नागरिकांनीही हरकत घ्यायला हवी. ते विचारणा करू शकतात. दुरुत्तरे मिळाली तर तक्रार करू शकतात. कुठे तक्रार करायची याचाही फलक लावणे यापुढे प्रत्येक वाहनतळचालकाला बंधनकारक करू. मात्र तक्रार आली पाहिजे. त्याशिवाय पालिका कारवाई करू शकणार नाही. नागरिकांनाच नाही तर पालिकेच्या एखाद्या कर्मचाऱ्यालाही असा अनुभव आला तर ते तक्रार करू शकतात.- सतीश कुलकर्णी, उपायुक्त, मालमत्ता व व्यवस्थापनटीम लोकमत : विवेक भुसे, सुनील राऊत, राजू इनामदार, लक्ष्मण मोरे, सुषमा नेहरकर-शिंदे