शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मांडवगण फराट्यात बिबट्याची दहशत

By admin | Updated: June 1, 2015 05:25 IST

मांडवगण फराटा (ता. शिरूर) परिसरात बिबट्याने सात शेळ्यांचा फडशा पाडला असून, बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

न्हावरे : मांडवगण फराटा (ता. शिरूर) परिसरात बिबट्याने सात शेळ्यांचा फडशा पाडला असून, बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, मांडवगण फराटा परिसरात वनविभागाने पिंजरे लावावेत, अशी मागणी उपसरपंच महादेव फराटे यांनी केली आहे.मांडवगण फराटा येथील शेतकरी मोहन राजाराम परदेशी, पद्माबाई जगताप, उल्हास पवार यांच्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करून त्यांचा फडशा पाडला. बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या जनावरांचा पंचनामा पशुधन विकास अधिकारी डॉ. जी. पी. सातकर व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे. मांडवगण फराटा परिसरातील ११ वा मैल, भैरू फराटवाडी व गावातील शिवारात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. मांडवगण फराटा परिसर भीमा नदीच्या काठावर असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात असलेली उसाची शेती, नदीकाठावर असलेले दाट जंगल, भीमेचे विस्तीर्ण पात्र त्यामुळे बिबट्याच्या वावरासाठी व रहिवासासाठी हा परिसर अनुकूल आहे. गेल्या दहा वर्षांत या भागात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.ग्रामस्थांना नेहमीच भीतीच्या सावटाखाली वावरावे लागते. या भागात पिंजरे लावण्याची मागणी ग्रामस्थांकडून वारंवार केली जात आहे. मात्र, या मागणीकडे वनविभागाकडून दुर्लक्ष होत आहे. यापुढे जर बिबट्याच्या हल्ल्यातून एखादी दुर्दैवी घटना घडली, तर त्याला वनविभागाचे आधिकारी व कर्मचारी यांना सर्वस्वी जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा मांडवगण फराटा येथील ग्रामस्थांनी दिला आहे. (वार्ताहर)