शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अधिसभेसाठी पॅनल बनविण्याच्या घडामोडींना वेग;१६ जागांसाठी एकूण १४३ अर्ज, आज छाननी, सोमवारपर्यंत माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 03:48 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणुकीच्या १६ जागांसाठी अर्ज भरण्याच्या मुदत समाप्तीनंतर एकूण १४३ अर्ज दाखल झाले आहेत. उद्या (शुक्रवारी) दाखल झालेल्या अर्जांची छाननी होणार आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणुकीच्या १६ जागांसाठी अर्ज भरण्याच्या मुदत समाप्तीनंतर एकूण १४३ अर्ज दाखल झाले आहेत. उद्या (शुक्रवारी) दाखल झालेल्या अर्जांची छाननी होणार आहे. दरम्यान अर्ज भरलेल्या विविध संस्थांच्या उमेदवारांनी एकत्र येऊन पॅनल बनविण्याच्या घडामोडींना वेग आला आहे. सोमवारी अर्ज माघारीनंतर पॅनलचे अंतिम चित्र स्पष्ट होऊ शकणार आहे.नवीन सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार पार पडत असलेली ही पहिलीच निवडणूक आहे. विद्यापीठ अधिसभेच्या नोंदणीकृत पदवीधरांच्या १० तर संस्था व्यवस्थापन प्रतिनिधींच्या ६ अशा एकूण १६ जागांसाठी निवडणूक होत आहे. संस्था व्यवस्थापन प्रतिनिधीच्या खुल्या गटातून १२, महिला गटातून २ तर अनुसूचित जाती गटातून १, अशा १५ जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. पदवीधर मतदारसंघामध्ये जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. पदवीधरच्या खुल्या गटातून ३४, महिला गटातून ५, ओबीसी गटातून ५, एसटी गटातून ३, अनुसूचित जाती गटातून १२, डीटी/एनटी गटातून १२ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. एका उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज दाखल केल्याने दाखल उमेदवारांची संख्या जास्त आहे. एकूण दाखल झालेल्या अर्जांची संख्या संस्था व्यवस्थापन गटातून ४५ तर पदवीधर मतदारसंघातून १४३ इतकी आहे.पदवीधर मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बंधू प्रसेनजित फडणवीस, अनिल विखे, अभिषेक बोके, गिरीश भवाळकर, बागेश्री मंठाळकर, अ‍ॅड. वर्षा डहाळे, डॉ. सुनील भडंगे, संदीप शिंदे यांच्यासह ९८ जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. संस्था व्यवस्थापन प्रतिनिधी गटातून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, राजेंद्र विखे पाटील, रमेश थोरात, संदीप कदम, नाशिक जिल्हा शिक्षण मंडळाच्या नीलिमा पवार, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे श्यामकांत देशमुख, अशोक सावंत, राजीव जगताप यांच्यासह ४५ अर्ज दाखल झाले आहेत.गुरुवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर आता पॅनल बनविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. अर्ज माघारी घेण्यासाठी उमेदवारांची मनधरणी केली जात आहे. काही संस्थांनी एकत्र येऊन निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे.दरम्यान, विद्यापीठ विकास मंचचे अध्यक्ष ए. पी. कुलकर्णी यांनी निवडणुकीकडे आम्ही राजकीय भूमिकेतून पाहत नाही, तरी विद्यापीठाच्या शैक्षणिक हितासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी, असे आवाहन केले आहे.पदवीधर मतदारसंघासाठी ५० हजार मतदारसंस्था व्यवस्थापन प्रतिनिधी पदासाठी केवळ २२९, तर पदवीधर मतदारसंघासाठी ४९ हजार ८०० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येणाºया बड्या संस्थांचे हे प्रामुख्याने मतदार आहेत. त्यामुळे संस्थाचालक एकत्र येऊन कसे पॅनल बनवितात यावर निवडणुकीचे चित्र अवलंबून राहणार आहे.राजेंद्र कांबळे यांची बिनविरोध निवडअधिसभा निवडणुकीमध्ये संस्था व्यवस्थापन प्रतिनिधीच्या अनुसूचितजाती प्रवर्गातून विद्यापीठ विकास मंचच्या राजेंद्र कांबळे यांचा एकमेव अर्ज दाखल झालाआहे. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.शुक्रवारी अर्जांची छाननीनंतर त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली जाईल. संस्था व्यवस्थापन प्रतिनिधी मतदारसंघात एकूण २२९ मतदार आहेत. त्यापैकी अनुसूचित जाती प्रवर्गातून केवळ दोनच मतदार होते. त्यापैकी एकच अर्ज दाखल झाला.सुनेत्रा पवारही बिनविरोध निवडल्या जाण्याची शक्यतासंस्था व्यवस्थापन प्रतिनिधी महिला राखीव मतदारसंघातून सुनेत्रा पवार व नीलिमा पवार हे दोन अर्ज दाखल झाले आहेत.नीलिमा पवार यांनी खुला गट व महिला राखीव या दोन्ही ठिकाणांहून अर्ज भरला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून महिला राखीव जागेचा अर्ज मागे घेतला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.त्यामुळे अधिसभेवर सुनेत्रा पवारही बिनविरोध निवडून जाण्याचाअंदाज विद्यापीठ वर्तुळातून वर्तविलाजात आहे.

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठ