शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

एका क्लिकवर लागणार पंडितजींचा शोध

By admin | Updated: February 2, 2016 00:53 IST

कोणताही विधी, पूजा-अर्चा, मुहूर्त, इतर धार्मिक माहिती घरबसल्या ‘पंडित आॅन क्लिक’ या वेब पोर्टलवर मिळणार आहे.

पिंपरी : कोणताही विधी, पूजा-अर्चा, मुहूर्त, इतर धार्मिक माहिती घरबसल्या ‘पंडित आॅन क्लिक’ या वेब पोर्टलवर मिळणार आहे. चिंचवड येथील प्रतिभा कॉलेज आॅफ बिझनेस मॅनेजमेंटचे विद्यार्थी विकास झा आणि हनुमंत पांडे या विद्यार्थ्यांनी हे वेब पोर्टल यशस्वीरीत्या बनविले आहे. पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेल्या ‘यंग इंडिया, स्टार्ट अप इंडिया’ संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन हे पोर्टल विकसित केले आहे. विविध पूजा विधी करण्यासाठी वारंवार भटजी शोधण्यात हेलपाटे मारावे लागतात. त्यातही वेळेवर भेटत नाही. अशा वेळी इंटरनेटवरून तुम्ही पूजेसाठी लागणारे साहित्य, त्यासाठी द्यावी लागणारी दक्षिणा, शुभमुहूर्त, पूजेचे स्वरूप अशी सर्व माहिती एकत्रितपणे घेऊन थेट भटजीच तुमच्या घरी उपलब्ध होऊ शकणार आहे. वेब पोर्टलचे उद्घाटन महापालिका आयुक्त राजीव जाधव झाले. या वेळी कॉलेजचे संस्थापक दीपक शहा, डॉ. प्रशांत गुंडावार, नगरसेविका सुजाता टेकवडे, नगरसेवक संजय वाबळे, विलास मडेगिरी उपस्थित होते.आयुक्त म्हणाले, ‘‘सत्यनारायण, लग्न, मुहूर्त, वास्तुशांती अशा अनेक पूजेच्या वेळी पुजारींना बोलावले जाते. यासाठी आता शोधाशोध करावी लागणार नाही. वेळेची बचत होईल.’’कॉलेजचे संस्थापक शहा म्हणाले, ‘‘कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण, योग्य प्रशिक्षण व नोकरी करण्यासाठी संधी उपलब्ध करून विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. संस्थेच्या वतीने २५ हजाराचा धनादेश विद्यार्थ्यांना मदत म्हणून दिला आहे. यासाठी गुरुराज डागरे यांनी सहकार्य केले आहे. ’’साडेतीन लाख रुपये खर्च करून हे पोर्टल विद्यार्थ्यांनी बनविले आहे. नागरिकांनी मागणी केल्यास काशी येथील पुजारी देखील पूजेसाठी उपलब्ध होतील. तसेच विविध धार्मिक पुस्तकेही लवकरच या पोर्टलवर उपलब्ध करून दिली जाणार आहेत. अवघ्या दोन दिवसांत या पोर्टलला एक हजार नागरिकांनी भेट दिली आहे, असे या विद्यार्थ्यांनी सांगितले.शहरात प्रथमच असे अनोखे पोर्टल बनविण्यात विद्यार्थ्यांना यश आले आहे. विद्यालयात शिकत असतानाच काही तरी अनोखे करण्याची जिद्द या तरुणांनी बाळगली होती. श्रुती शशीधरन व प्रिया भगोडिया यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)