पिंपरी : पिंपरी महापालिकेची निवडणूक २१ फेब्रुवारीला होणार आहे. उमेदवारीअर्ज भरताना उमेदवारांना आपला पॅन क्रमांक जोडणे राज्य निवडणूक आयोगाने बंधनकारक केले आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे पॅन क्रमांक नाही, अशा उमेदवारांची विशेषत: महिला उमेदवारांची अडचण होणार आहे.निवडणूक आयोगाच्या वतीने महापालिका निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांना आॅनलाइन अर्ज भरणे अनिवार्य केले आहे. अर्ज भरताना उमेदवारास शिक्षण, व्यवसाय, अपत्यांची माहिती, न्यायालयीन प्रलंबित प्रकरण, ज्या अपराधासाठी दोषी ठरविले असे प्रकरण, जंगम व स्थावर मालमत्तेची माहिती द्यावी लागते. सार्वजनिक वित्तीय संस्था, शासकीय, निमशासकीय संस्थेच्या थकीत रकमेचीही माहिती द्यावी लागणार आहे. अपत्यांचाही वेगळा अर्ज भरून द्यायचा आहे. यंदा उमेदवारीअर्ज भरताना पॅन क्रमांक आणि कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचीही माहिती द्यावी लागणार आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे पॅन क्रमांक नाही, त्यांची अडचण होण्याची शक्यता आहे. विशेषत: गृहिणी असणाऱ्या उमेदवारांची गोची होणार आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे सर्व व्यवहार पारदर्शी होणार असल्याने अनेक उमेदवारांना ते भविष्यात त्रासदायक ठरणार आहे. निरक्षर, ज्येष्ठ नागरिकांना मतदान कसे करायचे हे समजून सांगताना उमेदवारांच्या नाकीनऊ येणार आहे. परंतु, उमेदवारांची ही अडचण आता दूर होणार आहे. बाजारात डेमो व्होटिंग मशिन विक्रीला आले आहे. अगदी खऱ्या मतदान यंत्राप्रमाणे हे डेमो व्होटिंग मशिन बनविले आहे. बटण दाबल्यावर मतदान केल्यानंतर जसा आवाज येतो, त्या प्रकारचा आवाज या मशिनमधून येतो. (प्रतिनिधी)
उमेदवारांना पॅन क्रमांक सक्तीचा
By admin | Updated: January 31, 2017 04:12 IST