शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

पालिकेतही बापटांच्या गटाला धक्का

By admin | Updated: May 27, 2014 06:52 IST

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व नगरसेवक गणेश बीडकर यांची भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली.

पुणे : स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व नगरसेवक गणेश बीडकर यांची भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. खासदार व शहराध्यक्ष अनिल शिरोळे यांनी बीडकर यांच्या निवडीचे पत्र महापौर चंचला कोेद्रे यांना दिले. महापालिकेच्या २०१२च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे २६ नगरसेवक निवडून आले होते. त्या वेळेपासून बीडकर हे गटनेते पदाच्या स्पर्धेत होते. मात्र, ज्येष्ठ आमदार गिरीश बापट यांचे समर्थक नगरसेवक अशोक येनपुरे यांची गटनेतेपदी निवड झाली. गेल्या दोन वर्षांपासून येनपुरे महापालिकेतील भाजपचा कारभार पाहत आहेत. सध्या महापालिकेच्या पदाधिकार्‍यांच्या जपान दौर्‍यात ते सहभागी असताना अचानक बीडकर यांची निवड जाहीर केली आहे. लोकसभा निवडणुकीत शहराध्यक्ष अनिल शिरोळे यांच्या प्रचारात बीडकर यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना गटनेते पदाचे बक्षीस मिळाल्याचे बोलले जात आहे. तसेच, भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी समर्थक गिरीश बापट यांच्या गटाला या निवडीमुळे धक्का बसल्याची चर्चा आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रदेश कोअर कमिटीची बैठक २३ मे रोजी मुंबईला झाली. त्या वेळी बीडकर यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. गेल्या १२ वर्षांपासून बीडकर नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी स्थायी समिती व शहर सुधारणा समिती अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली आहे. भाजपच्या नगरसेवकांच्या बैठकीतही बीडकर यांच्या नावाला मान्यता मिळाली आहे, असे अनिल शिरोळे यांनी महापौरांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. (प्रतिनिधी)