शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पालखी रथाचे काम पूर्णत्वाकडे

By admin | Updated: November 11, 2014 23:30 IST

छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले पुरंदर ते संभाजीमहाराजांचे समाधिस्थळ श्री क्षेत्र वढू बुद्रुक, तुळापूर असा अभूतपूर्व भव्यदिव्य अशा पालखीसोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे.

कोरेगाव भीमा : धर्मवीर छत्रपती संभाजीमहाराजांच्या 325व्या बलिदान स्मरणदिन वर्षपूर्तीनिमित्ताने महाराष्ट्रात प्रथमच छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले पुरंदर ते संभाजीमहाराजांचे समाधिस्थळ श्री क्षेत्र वढू बुद्रुक, तुळापूर असा अभूतपूर्व भव्यदिव्य अशा पालखीसोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. ही पालखी सोहळ्याची परंपरा कायम राहणार आहे. या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी सुरु असून पालखी रथाचे कामही पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याचे पुणो जिल्हा कुस्तिगीर संघटनेचे अध्यक्ष व पालखी सोहळा प्रमुख पै. संदीप भोंडवे यांनी सांगितले. 
महाराष्ट्रात प्रथमच छत्रपती संभाजी महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आयोजनासाठी पुणो जिल्हा कुस्तिगीर संघटनेचे अध्यक्ष व पालखी सोहळा प्रमुख  पै. संदीपआप्पा भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री छत्रपती संभाजीमहाराज पालखी सोहळा समिती स्थापन करण्यात येणार आहे. या पालखी सोहळ्याचे नियोजन तुळापूरचे माजी सरपंच ज्ञानेश्वर शिवले, शिवाजी शिवले, वढु बुद्रुक व तुळापूर येथील ग्रामस्थ करत असल्याची माहिती मुखई (ता. शिरुर) ग्रामपंचायत सदस्य पै. सचिन पलांडे, विपुल शितोळे यांनी दिली. 
जगदगुरू तुकोबारायांची देहू ते पंढरपूर पालखी सोहळा सुरु करण्यास शंभूछत्रपतींनी सर्व खर्च व संरक्षण पुरवले होते. हाच इतिहासाचा ठेवा उराशी बाळगून तुकोबारायांच्या पालखीप्रमाणोच चांदीचा मुलामा दिलेला पालखी रथ तयार करण्याचे काम वेगात सुरु आहे. या पालखीसाठी आवश्यक  रथ, संभाजीमहाराजांचा चांदीचा मुखवटा, पादुका व इतर सामग्रीसाठी अंदाजे 2क् ते 22 लाख रुपये खर्च अपेक्षित असून या संपूर्ण खर्चाची जबाबदारी शंभूभक्तांनी घेतली आहे. पुणो जिल्ह्यासह महाराष्ट्रातील शंभूभक्तांनी आजपर्यत 12 लाखांपेक्षा जास्त रक्कम देण्याचे आश्वासन दिले असून, अडीच लाख रुपयेही जमा झाले आहेत. या पालखी सोहळ्यास महाराष्ट्रातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून, विविध भागातून पदाधिकारी, शंभूभक्त उपस्थित राहणार असून, या पालखी सोहळ्याच्या माहिीतीसाठी व लोकवर्गणी जमा करण्याचे आवाहन पै. संदीप भोंडवे यांनी केले आहे.
 
धर्मवीर छत्रपती संभाजीमहाराज यांच्या 325 व्या बलिदान स्मरणदिन वर्षपूर्तीनिमित्त महाराष्ट्रात साजरे होत असताना व शिवशंभू छत्रपतींचा खरा इतिहास समाजासमोर आला नसल्याने तो समाजासमोर मांडण्यासाठी दि. 18 मार्च ते 2क् मार्च या तीन दिवसांचा छत्रपती संभाजीमहाराज पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 
18 मार्च रोजी सकाळी छत्रपती शंभूराजांच्या जन्मस्थळ किल्ले पुरंदरावर रुद्राभिषेक घातल्यानंतर शिवशंभूंच्या जयघोषात अभूतपूर्व पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे. पुरंदरावरुन पालखी वडकी (ता. हवेली) याठिकाणी मुक्कामी थांबणार असून, त्यानंतर दि. 19 रोजी पालखीसोहळा संभाजी महाराजांचे समाधिस्थळ श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरुर) याठिकाणी मुक्कामी असणार आहे. 
दि.2क् मार्च रोजी फाल्गुन वद्य अमावास्येला सकाळी समाधिस्थळ श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथे शंभूछत्रपतींच्या समाधीस रुद्राभिषेक घालण्यात येणार असून तद्नंतर पालखी सोहळा शंभूछत्रपतींचे बलिदानस्थळ श्री क्षेत्र तुळापूर (ता. हवेली) या ठिकाणी दुपारी 11 वाजता समाधीची व शंभूराजांच्या पादुकांची पूजाआर्चा होऊन पूर्णाकृती पुतळ्यावर पुष्पवृष्टीने पालखी सोहळ्याची समाप्ती होणार आहे.