शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पालिका बसथांबा ‘बीआरटी’ हब

By admin | Updated: July 29, 2016 03:57 IST

महापालिका भवनाच्या मागील बाजूस असलेला पीएमपीचा बसथांबा ‘बीआरटी हब’ म्हणून विकसित करण्यात येणार आहे. पीएमपीने सुरू केलेल्या संगमवाडी ते नगर रस्ता आणि संगमवाडी

पुणे : महापालिका भवनाच्या मागील बाजूस असलेला पीएमपीचा बसथांबा ‘बीआरटी हब’ म्हणून विकसित करण्यात येणार आहे. पीएमपीने सुरू केलेल्या संगमवाडी ते नगर रस्ता आणि संगमवाडी ते विश्रांतवाडी या दोन्ही मार्गांसह औंध रस्त्यावर सुरू करण्यात येणाऱ्या बीआरटीसाठीचे हे हब असणार आहे. त्यात पहिल्या टप्प्यात संगमवाडी ते महापालिका भवन या मार्गावर बीआरटी सुरू होणार आहे. संचेती चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर महापालिकेपर्यंत बीआरटीसाठी मार्ग उभारला जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख राजेंद्र राऊत यांनी दिली. त्यामुळे संगमवाडीपासून धावणारी बीआरटी आता पालिकेपासून धावणार आहे.दोन वर्षांत महापालिकेकडून संगमवाडी ते नगर रस्ता आणि संगमवाडी ते विश्रांतवाडी या मार्गावर बीआरटी सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी कोणतेही हब अथवा टर्मिनल उभारण्यात आलेले नाही. शहरातील पीएमपीच्या वेगवेगळ्या डेपोंमधून ज्या गाड्या नगर रस्ता किंवा विश्रांतवाडीकडे जातात, त्यातील काही गाड्या बीआरटी मार्गातून सोडण्यात येतात. संगमवाडीपासून पालिकेपर्यंत स्वतंत्र बीआरटी कॉरिडॉर करण्यात येणार आहे. तीन मार्गांचे नियोजन शहरात पायलट बीआरटी प्रकल्प राबविल्यानंतर तब्बल आठ वर्षांनी महापालिकेने संगमवाडी ते विश्रांतवाडी आणि नगर रस्ता हा बीआरटी मार्ग सुरू केला आहे. प्रत्यक्षात बीआरटीसाठी आवश्यक असलेले ११० किलोमीटरच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे कामही पूर्ण झालेले आहे. मात्र, हे मार्ग अद्याप सुरू झालेले नाहीत. त्यातच नवीन दोन्ही मार्ग संगमवाडीपर्यंत असले तरी त्या ठिकाणी कोठेही बस टर्मिनल नाही. त्यामुळे तीन बीआरटी मार्गावरील गाड्या एकाच ठिकाणाहून सोडण्यासाठी महापालिका भवनाच्या बसथांब्यांची निवड करण्यात आली आहे. हा बसथांबा मध्यवर्ती भागात असल्याने तसेच पीएमपीच्या सर्व डेपोंमधून या ठिकाणी बस संचलन होत असल्याने हा थांबा बीआरटी हब म्हणून विकसित केला जाणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.