शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

रस्त्यांवर तळीराम सुसाटच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 00:34 IST

नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, म्हणून शासनाकडून दंडाच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आली. तसेच दारू पिऊन वाहन चालविताना पकडलेल्या चालकांचा फोटो आणि त्याचे तपशील सोशल मीडियावर जाहीर केले जातील, अशा उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.

पुणे : नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, म्हणून शासनाकडून दंडाच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आली. तसेच दारू पिऊन वाहन चालविताना पकडलेल्या चालकांचा फोटो आणि त्याचे तपशील सोशल मीडियावर जाहीर केले जातील, अशा उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. मात्र तरीही तळीरामांच्या संख्येत घट होत नसल्याचे गेल्या तीन महिन्यांत मोटार वाहन कायदा न्यायालयात दाखल झालेल्या प्रकरणाच्या संख्येवरून स्पष्ट होते, तर अवैध वाहतूकसुद्धा अजूनही सुरू असल्याचे दिसते.जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांत दारू पिऊन निष्काळजीपणे (ड्रिंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह अ‍ॅन्ड रॅॅश ड्रायव्हिंग) वाहन चालविल्याचे ४ हजार ८५० गुन्हे शिवाजीनगर येथील मोटार वाहन न्यायालयात दाखल झाले असून त्यातील २ हजार ७४१ प्रकरणे निकाली लागली आहेत. निकाली लागलेल्या तळीरामांकडून ६५ लाख २४ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या आकडेवारीच्या सरासरीचा विचार केला असता दररोज सुमारे ५० गुन्ह्यांची नोंद होत आहे, तर याच काळात अवैध वाहतूक करणाऱ्या पॅगो, जीप, सीक्ससीटरसारख्या वाहनांचे २५९ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील ३२० (गेल्या वर्षातील काही खटले) प्रकरणे निकाली लागली असून त्यांच्याकडून १६ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.त्यामुळे दारूच्या नशेत वाहन चालवताना पकडल्यानंतर होणारी कारवाई, निलंबित किंवा रद्द होणारा परवाना हे उपाय तळीराम चालकांना अद्याप लागू पडलेले नाहीत, तर प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि वाहतूक पोलिसांनी विविध कारवाया व अवैध वाहतूक करणारे वाहने अगदी जप्त केल्यानंतरदेखील शहरातील जीवघेणा प्रवास थांबलेला नाही. कारवाई झाल्यास वाहनचालकांना ५०० ते २ हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येतो.मद्यपान करून वाहन चालविल्याने अपघाती मृत्यू झाल्याच्या अनेक घटना शहरात झाल्या आहेत. त्याबाबत जनजागृती व वेळप्रसंगी कारवाई करूनही ही ड्रिंक अ‍ॅन्ड ड्राईव्हचे प्रकार कमी झाले नसल्याचे या आकड्यांवरून दिसते. त्याचबरोबर अवध्ौ वाहतुकीच्या प्रमाणातही वाढ झाली आहे.>ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीन ठरतेय उपयोगीपूर्वी एखाद्या वाहनचालकाने मद्यपान करून वाहन चालवित आहे, असा संशय आला तर त्याच्या रक्त व लघवीची तपासणी करण्यात येत असे. तपासण्यांचा रिपोर्ट आल्यानंतर त्यावर कारवाई होत. मात्र या प्रक्रियेमध्ये अनेक पळवाटा असल्याने वाहनचालक सुटत. पण ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीनमुळे चालक दारू पिऊन गाडी चालवत आहे की नाही हे लगेच समजते. त्यामुळे प्रकरणे दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून न्यायालयात गुन्हा दाखल असलेल्यांची रांग लागत आहे.जास्तीत जास्त ६ महिने कारावास किंवा २ हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा आहेत. तसेच संबंधित घटनेनंतर ३ वर्षांच्या आत दुसºया किंवा त्यानंतरच्यागुन्ह्यासाठी २ वर्षे कारावास किंवा २ हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा आहेत. त्यानुसार भोसरी येथे मद्यपान करून रिक्षा चालविणाºया रिक्षाचालकाला दोन महिने कारावासाची शिक्षा मोटार वाहन कायदा न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायादंडाधिकारी एम. पी. सराफ यांच्या न्यायालयाने सुनावली आहे. अवैध वाहतूक व ड्रिंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह करणाºया चालकांना वाहतूक पोलीस घटनास्थळी समन्स बजावतात. समन्स घेऊन संबंधिताने मोटार वाहन कायदा न्यायालयात जायचे. त्या ठिकाणी गुन्हा कबूल केल्यास दंड वसूल करण्यात येतो. मात्र जर गुन्हा कबूल नसेल तर तो खटला चालविला जातो.रिक्षाचालकाला दोनमहिने कारावासाची शिक्षामोटार वाहन अधिनियमाच्या कलम १८५ नुसार मद्यपान करून अथवा अमली पदार्थांच्या प्रभावाखाली वाहन चालविणाºया व्यक्तीस पहिल्या गुन्ह्यासाठी