शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुकांकडून ‘व्हॉट्स अ‍ॅप’चा अतिरेक

By admin | Updated: August 27, 2014 05:27 IST

पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळवू शकतील, असे आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवार मोठे फ्लेक्स लावून जाहिरातबाजी करू लागले आहेत

पिंपरी : पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळवू शकतील, असे आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवार मोठे फ्लेक्स लावून जाहिरातबाजी करू लागले आहेत; परंतु अधिकृत परवानगी घेऊन एखाद-दुसरा फलक लावण्याचीही ज्याची कुवत नाही, अशांनी मोबाईलवरील ‘व्हॉट्स अ‍ॅप’ या माध्यमाचा वापर अतिरेकीपणे सुरू केला आहे. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून व्हॉट्स अ‍ॅपवर अधिकाधिक ग्रुप तयार करून वेगवेगळे संदेश, छायाचित्रे पाठवली जात आहेत. या कृत्याने मोबाईलधारक वैतागले आहेत.विविध पक्षांचे प्रमुख पदाधिकारी,आमदार, नगरसेवक आणि कार्यकर्ते यांचे ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर ग्रुप तयार करण्यात आले आहेत. आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांच्या नावे हे ग्रुप असून, त्यांचे निकटवर्तीय कार्यकर्तेच ग्रुप अ‍ॅडमिन आहेत. मिनिटा-मिनिटाला त्या ग्रुपवर काही तरी संदेश, कॉमेंट, छायाचित्रे धडकू लागली असली, तरी प्रत्यक्ष दूरध्वनी केल्यानंतर मात्र यांपैकी कोणीच भेट घेण्यास सहज उपलब्ध होत नाही. प्रत्यक्ष भेटीसाठी कार्यालयात गेल्यानंतरही साहेब कामात आहेत, असे सांगून ताटकळत ठेवले जाते. विकासकामे केली, जनतेच्या हितासाठी कटिबद्ध आहोत, असे भासवणारे लवकर भेटतही नाहीत, याबद्दल खेद व्यक्त होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून परिवर्तन घडू शकते, असा समज झाल्याने स्वत:ची छबी वारंवार व्हॉट्स अ‍ॅपवर झळकवून निवडणूक जिंकू शकतो, असा आत्मविश्वास इच्छुक बाळगून आहेत. कामच केले नाही, तर व्हॉट्स अ‍ॅपवर छबी झळकावण्याचा उपयोग नाही.(प्रतिनिधी)