शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

हवामानबदलावर मात

By admin | Updated: March 27, 2017 02:13 IST

बोरीबेल येथील प्रगतशील शेतकरी बाळकृष्ण पाचपुते हे आपल्या शेतात पारंपरिक पद्धतीने शेती न करता नवनवीन प्रयोग करत

अमोल सातव / देऊळगावराजेबोरीबेल येथील प्रगतशील शेतकरी बाळकृष्ण पाचपुते हे आपल्या शेतात पारंपरिक पद्धतीने शेती न करता नवनवीन प्रयोग करत बाराही महिने कलिंगड, खरबूज, टोमॅटोसारखी पिके घेतात. सकाळी थंडी आणि दिवसभर कडक उन्हाळा हवामानाच्या या विचित्र लहरीवर मात करीत पाचपुते यांनी जिद्द, चिकाटी, कष्ट आणि अनुभवाद्वारे आपल्या ३ एकरात कलिंगड, खरबूज पीक जोमाने आणले आहे. परिणामी त्यांनी पावसाळ्यातसुद्धा कलिंगड, खरबूज यासारखी पिके यशस्वीपणे घेत असल्याचे पाचपुते यांनी सांगितले.दरम्यान, सुरुवातीला त्यांनी आपल्या ३ एकर शेतात ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेताची उभी आडवी नांगरणी केली. त्यानंतर शेणखत घातले व उभ्या, आडव्या काकऱ्या घातल्या. शेतामध्ये पाच फुटांपर्यंत बेड तयार केले. त्यावर ड्रिप अंथरून मजुरांच्या साहाय्याने मल्चिंग पेपर त्यावर टाकण्यात आला. तीन एकरामध्ये कुंदन खरबुजाची अठराशे रोपे लावण्यात आली. त्यानंतर खत व औषधे झाडाच्या गरजेनुसार दिल्याने पाच फुटांपर्यंतचे बेड पूर्ण वेलाने झाकले आहे. परंतु चालू वर्षी हवामान विचित्र असल्याने खरबुजाला औषध फवारणी जास्त कराव्या लागल्या. कारण दिवसा उष्णता व संध्याकाळी थंड हवामान यामुळे पिकांची वाढ खुटली. मात्र बाळकृष्ण पाचपुते यांनी हवामानाच्या विचित्र लहरीवर मात करीत खरबूज पीक जोमाने पिकवले आहे. एकंदरीत त्यांनी खरबजू, कलिंगड या पिकांवर सातत्याने वेगवेगळे प्रयोग आपल्या शेतात घेतल्याने आता या पिकात ते यशस्वी झाले आहेत. परिणामी त्यांच्या शेतातील खरबूज आणि कलिंगडाचा मळा पाहण्यासाठी परिसरातील शेतकरीवर्ग नेहमीच भेट देऊन या पिकाबाबत सविस्तर माहिती घेताना दिसत आहेत.