शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

परदेशी पाहुण्यांमुळे परिसर होतोय रम्य

By admin | Updated: January 1, 2015 01:07 IST

थंडीची चाहूल लागताच परदेशी पाहुणे जलाशयाच्या ठिकाणी येतात. सुंदर पक्ष्यांचे नयनरम्य दर्शन आपल्याला घडते.

हडपसर : थंडीची चाहूल लागताच परदेशी पाहुणे जलाशयाच्या ठिकाणी येतात. सुंदर पक्ष्यांचे नयनरम्य दर्शन आपल्याला घडते. त्यांचा किलबिलाट, त्यांचे विविध प्रकारचे आवाज प्रत्येकाला हवेहवेसे वाटतात. निसर्गाच्या सान्निध्यात या पक्ष्यांबरोबर आनंद घेण्यासाठी पक्षीप्रेमी भल्या सकाळी जलाशयाच्या ठिकाणी भेटी देऊ लागले आहेत. अतिथी देवो भव ही आमची संस्कृती आहे. त्यामुळे आजही जलाशयाच्या ठिकाणी कोसो मैल दूरहून परदेशी पाहुणे येतात. थंडी सुरू झाली, की पक्ष्यांचे थवेच्या थवे जलाशयाकडे धाव घेतात. या पक्ष्याबरोबर आनंद लुटण्याची मजा काही औरच असते. त्यासाठी जलाशयावर जायला पाहिजे.पुण्याच्या पूर्व भागातील अनेक वर्षांपासून कवडीपाट हे देशीपरदेशी पक्ष्यांसाठी मुक्कामाचे हक्काचे ठिकाण होते. या ठिकाणी थंडीमध्ये पक्षांचा किलबिलाटात त्यांचे अनोखे संमेलनच भरण्याचे ठिकाणच होते. तिबेट, सायबेरिया, नेपाळ, नॉर्थ एशिया, साऊथ-ईस्ट एशिया, आॅस्ट्रेलिया अशा वेगवेगळ्या प्रदेशांमधून दर वर्षी येथे पक्षी येतात. या पक्ष्यांमध्ये ब्राह्मणी बदक, ग्लॉसी आयबीज, ब्लॅक आयब्रीज, ब्लॅक नेक आयबीज, पेेंटेड स्टॉर्क, नकटे बदक, स्टॉर्क, धोबी आणि देशी पक्ष्यांचाही समावेश होता. मात्र, कवडीपाटची सध्याची स्थिती विषण्ण करणारी असल्यामुळे पक्ष्यांबरोबर पक्षी-निरीक्षकांनीही या जलाशयाकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसत आहे.शहर परिसरातून नदीतील पाण्यावाटे प्लॅस्टिक, थर्माकोल, कपडे, कचरा वाहत येत असल्यामुळे बंधाऱ्यापाशी अडकला आहे. त्यामुळे नदीचे पाणी दूषित झाले आहे. प्लॅस्टिकच्या वेष्टनात असलेले अन्न पक्षी खातात. मात्र, ते खात असताना पक्ष्यांच्या पोटामध्ये प्लॅस्टिक गेल्यामुळे अनेक पक्ष्यांना जीवही गमवावा लागत आहे, अशी माहिती पक्षीप्रेमींनी दिली. येथील परिस्थिती सुधारण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे. तसेच, पक्ष्यांचे अस्तित्व टिकविण्याबरोबर पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी शहरातून वाहत येणाऱ्या कचरा थांबविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, अशीच भावना पक्षीप्रेमींबरोबर निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)४अलीकडे प्लॅस्टिकचा कचरा, निर्माल्य, फाटके कपडे आणि कचऱ्यामुळे कवडीपाट येथील जलाशयात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे हा जलाशय आता पक्षांसाठी मृत्यूचे माहेरघर बनले आहे की काय, अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे पक्ष्यांच्या संख्येत मोठी घट होत असल्याचे पक्षीप्रेमींनी सांगितले. खडकवासला, पानशेत, वरसगाव, तसेच शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर पुण्याच्या पूर्व भागात असलेले हवेली तालुक्यातील कवडीपाट हे गाव सोलापूर रस्त्यालगत आहे.