शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

ओतूरला बंधारे, रस्ते गेले वाहून

By admin | Updated: July 13, 2016 00:35 IST

परिसरात तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे नुकसान काही शेतकऱ्यांच्या विहिरी-घरे पडून नुकसान झाले

ओतूर : ओतूर (ता. जुन्नर) परिसरात तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे नुकसान काही शेतकऱ्यांच्या विहिरी-घरे पडून नुकसान झाले. विविध वाड्या-वस्त्यांना जोडणारे रस्ते, पूल वाहून गेल्यामुळे नुकसान झाले. या भागातील घरे, विहिरी, उभी पिके, रस्ते वाहून गेल्याने ग्रामस्थ व शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांच्या या नुकसानाचे शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ओतूरचे सरपंच धनंजय पाटील डुंबरे यांनी केली आहे.शुक्रवारी, शनिवारी व रविवारी या विभागात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे ओतूूर गावाजवळील गाढवेपट, पानसरेपट, डोमेवाडी, पानसरेवाडी, राहाटी, ढमालेमळा, भांडवळण, घुलेपट, तांबेमळा नं. १, नं. २, मानभवमळा आदी ठिकाणी शेतकऱ्यांनी टोमॅटो, सोयाबीन, वालवड, फरशी, फ्लॉवर, काकडी, मिरची, कोबी, मेथी, कोथिंबीर, पालक, भुईमूग आदी पिके, पालेभाज्या, ऊस ही नगदी पिके घेतली. परंतु, या पावसामुळे शेतात पाणी साठले व लगतच्या शेतकऱ्यांच्या शेताचे बांध, ताली फुटल्यामुळे पाण्याच्या जोराने व सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे काही पिके पाण्यात सडली. काही पिके पाणलोटामुळे वाहून जाऊन नुकसान झाले.गाढवेपट, पानसरेपट, भावळी रस्ता, मुंजेवाडी रस्ता व रस्त्यावरील पूलही वाहून गेला. ओतूर ग्रामपंचायतीने शेटेवाडी परिसरात दोन बंधारे बांधले होते. हे दोन्ही बंधारे फुटून वाहून गेले. ओतूर (ता. जुन्नर) येथे दशक्रिया विधीच्या ठिकाणी असलेले कंपाऊंट लोखंडी कठड्यासह वाहून गेले. येथील स्मशानभूमीही पुराच्या पाण्याखाली गेल्याने तिचेही नुकसान झाले. ओतूरजवळील आधार नलावडे व श्रीकृष्ण रामचंद्र डुंबरे या दोघांच्या (नवीन) विहिरी पाण्याच्या जोरामुळे पडून नुकसान झाले.ओतूर शहरात जी जुने घरे होती, तीही अतिवृष्टीमुळे खचून पडली. अशा घरांची संख्या २० आहे. देवगल्ली येथे व डोमेवाडी येथील बाळू बाबाजी मोरे यांची घरे पडून अतिवृष्टीमुळे घरातील सर्व सामान व संसार भिजून नुकसान झाले.ओतूर परिसरात ऊस, केळीबरोबर कांदा व टोमॅटो ही प्रमुख पिके आहे. डोमेवाडी परिसरात १०० एकर नवीन जातीच्या टोमॅटोची लागवड केली होती. या टोमॅटोची तोडणीही सुरू होती. एक एकर टोमॅटोसाठी शेतकऱ्याला सुमारे दीड लाख रुपये खर्च येतो; परंतु अतिवृष्टीमुळे डोमेवाडी व ओतूर परिसरातील सर्व टोमॅटो उत्पादकांच्या टोमॅटोपिकाचे, बागांचे १०० टक्के नुकसान झाले आहे, असे बबन अर्जुन भोरे यांनी सांगितले. या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत, अशी मागणीही त्यांनी केली.ओतूर विभागात कांदा हेही प्रमुख पीक आहे. कांद्याला बाजारभाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातच कांदाचाळ उभारून कांदा साठवण केली होती. त्यामुळे ओतूर-फापाळे शिवारात सपाट असणाऱ्या सुमारे ५० कांदाचाळीत शेतात पाणी साठल्यामुळे संपूर्ण कांदा भिजला. अती ओलाव्यामुळे काही शेतकऱ्यांच्या कांदाचाळी कलंडल्या व शेतात असलेल्या पाण्यामुळे कांदा सडून नुकसान होणार आहे, असे सरपंच धनंजय डुंबरे म्हणाले.ओतूर शहर, डोमेवाडी, फापाळे शिवार येथे काही घरे पडली आहेत, असे १५ ते २० जणांनी येऊन सांगितले. (वार्ताहर)