शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या वडिलांवर कोयत्याने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने त्याच्या तीन साथीदारांसह तरुणीच्या वडिलांवर कोयत्याने वार केले. तसेच तरुणीसह ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने त्याच्या तीन साथीदारांसह तरुणीच्या वडिलांवर कोयत्याने वार केले. तसेच तरुणीसह तिच्या बहिणीला देखील मारहाण केली. ही घटना हडपसर येथील काळेपडळ येथे रविवारी रात्री अकराच्या सुमारास घडली.

याप्रकरणी काळेपडळ येथे राहणार्या ४० वर्षाच्या व्यक्तीने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन सौरभ अडागळे, सागर अडागळे, रोहित भोसले या तिघांसह एका अल्पवयीनला पोलिसांनी अटक केली आहे.

सौरभ अडागळे याने फिर्यादींच्या मुलीकडे प्रेमाची मागणी केली होती. मात्र तिने सौरभला नकार दिला होता. त्यामुळे सौरभ हा चिडून होता. त्यातूनच त्याने फिर्यादींच्या घरासमोर येऊन आरडा-ओरडा करत राडा घातला होता. त्यावेळी फिर्यादींनी त्याला जाब विचारला असता, त्याने त्यांना जीवे ठार करण्याची धमकी दिली होती. दरम्यान फिर्यादी हे याबाबत तक्रार देण्यासाठी पोलिस चौकीकडे निघाले असता, सौरभ व त्याच्या तीन साथीदारांनी माझ्या भावाला का मारलेस तुला जीवंत सोडणार नाही असे म्हणत कोयत्याने त्यांच्या डोक्यात व खाद्यावर वार केले. तसेच लाथाबुक्यांनी व दगडानी मारहाण करून त्यांच्या दोन्ही मुलींना देखील मारहाण केली. एवढेच नाही तर परिसरात दहशत निर्माण करत हातातील कोयते हवेत फिरवून व दगड हातात घेऊन आमच्या नादी कोण लागले तर एकाएकाला जीवंत सोडणार नाही असे म्हणत गोंधळ घातला.