शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

...तर निवडणुकीवर आमचा बहिष्कार

By admin | Updated: February 2, 2017 03:44 IST

चासकमान धरणातून चालू असलेल्या दुसऱ्या आवर्तनाला विरोध करण्यासाठी खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी डेहणे येथे बुधवारी निषेध मेळावा घेतला व आपल्या

डेहणे : चासकमान धरणातून चालू असलेल्या दुसऱ्या आवर्तनाला विरोध करण्यासाठी खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी डेहणे येथे बुधवारी निषेध मेळावा घेतला व आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. पाणी सोडण्यात आल्याने आमची पिके गेल्यातच जमा आहेत. निदान गाईगुरं तडफडून मरणार नाहीत, यासाठी तरी त्वरित पाणी सोडण्याचे बंद करावे, अन्यथा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकू, असा इशारा वांजळे गावचे शेतकरी विठ्ठल सोळसे यांनी दिला.डेहणे परिसरातील २७ गावांतील शेतकऱ्यांना हे धरण भविष्यात वरदान ठरणार आहे, अशी आशा दाखवण्यात आली. नाममात्र दरात जमिनी संपादित करण्यात आल्या. पण, दुर्दैवाने दर वर्षी शिरूर व खेडच्या पूर्वेकडील सधन शेतकऱ्यांच्या व पुढाऱ्यांच्या दबावाखाली पश्चिम भागातील आदिवासी शेतकऱ्यांचा विचार न करता पाणी सोडले जाते. या वेळी दुसरे आवर्तन फक्त २६ दिवसांच्या अंतराने सोडण्यात आले आहे. दुसऱ्या आवर्तनाने तर डेहणे परिसरात पाण्याने तळ गाठला आहे. या वेळी उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी हक्काचे पाणी पळवले जाते. त्यावर पश्चिम भागातील शेतकऱ्यांचा अधिकार आहे व त्यासाठी त्वरित आवर्तन बंद करावे, असा ठराव संमत केला. हा ठराव तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य मंगल चांभारे, माजी सभापती अरुण चांभारे, सभापती सुरेश शिंदे, शंकर कोरडे, गवारी गुरुजी, विठ्ठल वनघरे, शिवाजी वाळुंज, धोंडीभाऊ दरेकर, जिल्हा दक्षता कमिटीचे तुकाराम भोकटे आदी उपस्थित होते. मोर्चाचे आयोजन माऊली वाढाणे, अनिल सोळसे, रामदास कोरडे, विठ्ठल सोळसे या तरुण शेतकऱ्यांनी केले. प्रशासनाने आमच्या हक्काचे पाणी आम्हाला द्यावे . वांजाळे गावापर्यंत पाणीसाठा मार्चपर्यंत व किमान एप्रिलमध्ये डेहण्यापर्यंत राहील, असे नियोजन करावे. आता आमच्या जमिनी घेतल्या. पुन्हा पाण्यासाठी धरणात उड्या मारून जीव देण्याची वेळ आणू नका. - शंकर कोरडे, सामाजिक कार्यकर्ते. अस्तरीकरण अपूर्ण आहे. त्यामुळे कालव्यातून पाणी गळती होऊन पाण्याची प्रचंड प्रमाणात नासाडी होत आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य असल्याने त्वरित पाणी सोडण्याचे बंद करावे. प्रस्तावित बुडीत बंधाऱ्यांना मंजुरी देऊन हा प्रश्न कायमचा निकाली काढावा .अरुण चांभारे, माजी सभापती, पुणे जिल्हा परिषद.