शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा रस्त्यावरच भाजीविक्री करू

By admin | Updated: December 29, 2014 00:43 IST

भोर शहरातील अनधिकृत भाजी विक्रेत्यांविरोधात मंडईतील भाजीव्यावसायिकांनी दंड थोपटले आहेत. नगरपरिषदेने त्यांच्यावर कारवाई

भोर : भोर शहरातील अनधिकृत भाजी विक्रेत्यांविरोधात मंडईतील भाजीव्यावसायिकांनी दंड थोपटले आहेत. नगरपरिषदेने त्यांच्यावर कारवाई न केल्यास त्यांच्या विरोधात रस्त्यावरच दुकाने थाटण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. भोर शहरातील रस्त्यावर अनाधिकृतपणे भाजी विक्री करणा-यांमुळे भाजी मंडईत अधिकृतपणे भाजी विक्री करणा-या दुकानदारांचा व्यावसाय होत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. भोर शहरात भाजी विक्रेत्यांसाठी सुमारे २५ वर्षापुर्वी भाजी मंडई उभारण्यात आली होती. मात्र सध्या ही इमारत गळत असुन धोकादायक बनली आहे. यामुळे भाजी विक्रेत्यांनी मंडईच्या बाहेर तातपुरत्या स्वरुपात ताडपत्रीच्या साहयाने स्टॉल उभारले आहेत. मंडईला संरक्षक भिंत नसल्याने मोकाट जनावरांचा अधिक वावर असतो. सर्वत्र कच-याचे ढिग,गवत केरकचरा पडलेला असल्याने या परिसरात दुर्गंधी पसरली असते. या ठिकाणी डांबरीकरण नाही तसेच वीजेचीही सोय नाही. यामुळे रात्री अपरात्री जनावरे भाजी पाला खातात. अनेकदा चो-या ही होतात. अशा वातावरणात व्यावसायिकांना भाजी पाला विकावा लागतो. दरम्यान, भोर शहरात सुमारे २२ ते २५ भाजी विक्रेते महात्मा फुले भाजी मंडईत अधिकृतपणे भाजीपाला विक्री करूण आपला उदरनिर्वाह करतात. मात्र, मगिल दोन ते तीन वर्षांपासुन भोर शहरातील नगरपलिका चौक ते एस टी स्टॉड व नीरा नदीच्या पुलाच्या पलिकडे भोलावडे गावाच्या हद्दीत भर रस्त्यात बसुन अनाधिकृतपणे भाजी विक्री करणा-यांची संख्या वाढली आहे. यामुळे भोर शहरासह ग्रामीण भागातुन येणारे ग्राहकांना ते जवळ पडत असल्याने रस्त्यातच भाजी खरेदी करतात आणी पुन्हा एस. टी.स्टॅडवर जातात. यामुळे भाजी मंडईत भाजी खरेदी करण्यासाठी ग्राहक येत नसल्याने अधिकृतपणे भाजी विक्री करणा-या दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे अनेकांनी आपला यावसायही बंद केला आहे. भोर नगरपलिकेला याबाबत वारंवार निवेदन देऊनही त्यांनी दुर्लक्ष होत असल्याने नगरपलिकेकडुन पावत्या फाडणा-या ठेकेदाराकडुन या अनाधिकृत भाजी विक्र्रत्यांकडुन जादा पैसे घेऊन त्यांना अभय देत असल्याची चर्चा आहे. यामुळे महात्मा फुले भाजी मंडईतील अधिकृत भाजी विक्री करणारे दुकानदार त्रस्त झाले आहेत. भाजी विक्रीच होत नसल्याने उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली आहे. रस्त्यावरील अनाधिकृत भाजीपाला विक्रेते बंद करा अन्यथा रस्त्यावर दुकाने मांडून भाजी विक्री करु असा इशारा विक्रत्यांनी दिला आहे.