शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

जिल्ह्यात सर्जा-राजाचा सण उत्साहात, गावागावांत मिरवणुका, विविध कार्यक्रमांचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 00:50 IST

वर्षभर शेतात बळीराज्या बरोबर राबणा-या सर्जा-राजाचा सण म्हणजे बैलपोळा. हा सण संपूर्ण जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच शेतकरी बैलांना सजवण्याच्या कामात व्यस्त होते. सायंकाळी गावातून मिरवणूक काढून त्यांना पुरणपोळीचा नैवैद्य देण्यात आला.

पुणे-  वर्षभर शेतात बळीराज्या बरोबर राबणा-या सर्जा-राजाचा सण म्हणजे बैलपोळा. हा सण संपूर्ण जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच शेतकरी बैलांना सजवण्याच्या कामात व्यस्त होते. सायंकाळी गावातून मिरवणूक काढून त्यांना पुरणपोळीचा नैवैद्य देण्यात आला.>सासवडमंगळवारी पुरंदरच्या अनेक भागांत भाद्रपद बैलपोळा शेतक-यांनी आनंदाने साजरा केला. सकाळीच दुथडी भरून वाहणा-या नद्या-नाल्यांतून बळीराजांनी आपल्या बैलांना न्हाऊ घातले. त्यानंतर दुपारी विविध रंग, सजावटीचे साहित्य वापरून, फुलांच्या माळा घालून बैलांना सजवण्यात आले. पुरंदरच्या पूर्व भागात पिसर्वे-नायगाव -पारगाव आदी भागांत सायंकाळी मुख्य मार्गावर शेतकºयांनी आपापली बैले व अन्य जनावरे मिरवणुकीने ग्रामदैवताला नेत असल्याचे चित्र होते.>पाईटपरिसरात भाद्रपदी बैलपोळा सण अतिशय उत्साही व वातावरणात पार पडला. तालुक्याच्या पश्चिम भागात बैलपोळा भाद्रपद महिन्यात शेतकरी साजरा करत असतात. या वेळी दोन अमावास्या आल्याने अनेक गावांमध्ये बैलपोळा साजरा करण्याबाबत द्विधा स्थिती होती. परंतु बहुतांशी गावांमध्ये मंगळवारी बैलपोळा साजरा करण्यात आला.>वडगाव निंबाळकरबाराही महिने शेतात राबणाºया बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळ्याचा उत्सव साजरा करण्यात येतो. आपल्या सजार्राजाच्या वर्षभरातील कामाची उतराई म्हणून पोळ्यानिमित्त मनोभावे पूजा करून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका काढून तसेच फटाक्यांची आतषबाजी करत वडगाव निंबाळकर परिसरात बैलपोळा सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला.गेल्या दोन ते तीन वर्षांपासून दुष्काळाचे सावट होते. त्यामुळे बैलपोळ्यावरही याचा परिणाम जाणवत होता. यंदाही पावसाने पाठ फिरवली, त्यामुळे खरीपातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. पोळा या सणावरही संकट ओढावले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून दमदार पाऊस झाल्याने शेतात पिके बहरली आहेत यामुळे यंदाचा पोळा शेतकºयांसाठी आनंदाची पर्वणी देणारा ठरला. प्रत्येक शेतकºयांनी आपल्या बैलजोडीची सजावट करून गावातील मंदिरांसमोर ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढून आपल्या घरासमोरील प्रांगणात कुटुंबियांसमवेत मनोभावे बैलजोडीची पूजा केली. बैलजोडीला पूरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालून ‘जुनं ते सोनं, नव्या संसाराचं लेणं’ असणारा बैलपोळा हा सण साजरा करण्यात आला. काहींनी शेतकºयांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करीत आपल्या बैलजोडीचे मनोभावे स्वागत केले. पोळ्याच्या दिवशी पोळा सणा निमित्ताने गोंडे, शेंब्या, घांगरमाळ, मोत्याचा सर, बाशिंग, झुल, घाटी, घोगरं, पैंजण, रेबीन, चाळ, कासरा, मोरखी, पितळी चैन, वेसनी, कवडीमाळ, तिरंगा माळ आदी सजावटीचे साहित्य विविध आकर्षक रंगीबेरंगी साज घालत बैलांच्या शिंगाला रंगी बेरंगी रेबीन बांधून त्यांना विविध रंगाने रंगवलेले होते. तर शिंगाला विविध रंगांचे गोंडे बांधून आकर्षक सजावट करून गावातून ढोल-ताशांच्या तालावर गुलालाची उधळण करत, फटाक्यांची आतिषबाजी करून तरुण शेतकरी वर्गाने मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी अनेक बैलजोड्या या मिरवणूकीत मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. सायंकाळी ग्राम प्रदर्शना घालून आल्यावर आपल्या सर्जा-राजाचे पूजन करत त्यांना पुरणपोळीचा नैवद्य देवून पोळा सण साजरा केला.>काटेवाडीयेथे बैल पोळा उसाहात साजरा करण्यात आला. काटेवाडीसह ढेकळवाडी, खताळपट्टा, कन्हेरी, पिंपळी, लिमटेक, मासाळवाडी येथील शेतकरी वर्गाने लाडक्या सर्जा-राजा बैलाना घुंगरू, फुगे, रेशमी गोडा, माळा, बांशिगे, घुंगरू पट्टा, चाळ घालून बैलांना सजविण्यात आले होते.शिंगाना बेगडे शेबे घालून तसेच आकर्षक रंगबिरंगी झुलीसुध्दा घालून सजवले होते. गतवर्षीच्या मानाने सजावटीच्या साहित्यामध्ये दहा ते बारा टक्के वाढ झाली आहे. मात्र, भरपूर पाऊस झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे उत्साहाने बैलांना सजावटी सह रंगवून पारंपारिक पद्धतीने ढोल ताशा हलगीच्या निनादात पारंपारिक पद्धतीने बैलांची मिरवणूक काढण्यात आली होती. बैल वर्षभर शेतात राबत असतो. त्याच्या कष्टामुळे धनधान्य मिळते. त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्याने केलेल्या कष्टाचे स्मरण व्हावे म्हणून वर्षातून एक दिवस बैलपोळा साजरा केला जातो. सर्वसाधारणपणे हा सण शेतकरी साजरा करतात. या दिवशी शेतकरी बैलांना अंघोळ घालून शिंगाना बेगड लावण्यात आला.पाठीवर झूल घालून बैलांना वाजत गाजत मारूतीच्या दर्शनाला नेण्यात आले. आजच्या दिवशी बैलांनी पूर्ण विश्रांती घेतली. संध्याकाळी बैल वाजत गाजत आणुन त्यांना पुरणपोळी भरविण्यात आली. ग्र्रामीण भागात तर बैल नसलेल्या कुटुंबानी मातीच्या बैलाच्या मूर्तीची पुजा केली. तर काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने बैलाची लग्न सोहळासुद्धा पार पडला.>काटीभाद्रपदी बैलपोळ््या निमित्त शहाजीनगर, काटी, खंडोबाची वाडी, भोडणी, सुरवड व बावडा परीसरात घरातील सुवासणीनी साध्या कपिलाचे गोड नैवद्य भरवून घराच्या अंगणात पूजन केले.तर काटी येथील आदर्श गो पालक वैभव वाघमोडे यांच्या बैलजोडीला पहिला मिरवण्यांचा मान मिळाला. गावरान साध्या कपिला गाई ग्रामीण भागात गोमूत्र व शेण पाळण्यांची प्रथा आजतागायत आहे. पोळा सणा दिवशी स्नान, गोड घास तसेच पूजा केली जाते,महिलांनी हळदीकुंकू लावत व गोड घास भरवत कपिलाचे पूजन केले. तर बाभुळगाव परीसरात बैल जोडी ची मिरवणूक वाजतगाजत, तोफांची सलामी देत काढली. तर काही ठिकाणी गव्हाची खीर, पुरण पोळी व शुद्ध पाणी शिफडत बैलांना प्रसाद घालित नांगरांची पूजा करून बैल पोळा साजरा करण्यांत आला.