शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

‘पुणे प्रॉपर्टी शोेकेस २०१६’चे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2016 01:20 IST

गेल्या चार वर्षांपासून लोकमत पुणे प्रॉपर्टी शोकेस’ या नावाने पुण्यातील नामांकित व प्रथितयश बांधकाम व्यावसायिकांच्या प्रदर्शनाचे आयोजन करते.

पुणे : गेल्या चार वर्षांपासून लोकमत पुणे प्रॉपर्टी शोकेस’ या नावाने पुण्यातील नामांकित व प्रथितयश बांधकाम व्यावसायिकांच्या प्रदर्शनाचे आयोजन करते. यंदाचे या उपक्रमाचे हे यशस्वी पाचवे वर्ष असून, यामध्ये पुण्यातील ३५ बांधकाम व्यावसायिकांचे २०० हून अधिक गृहप्रकल्प यात पाहता येणार आहेत. हे भव्य गृहप्रकल्प प्रदर्शन शनिवार, दि. २६ व रविवार दि. २७ मार्च २०१६ रोजी गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट येथे होणार असून, सदर प्रदर्शनासाठी प्रवेश विनामूल्य असून, प्रदर्शनाची वेळ सकाळी १० ते रात्री ८ आहे. या गृह प्रदर्शनामध्ये पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे पुण्यातील निवडक प्रकल्प पाहता येणार आहेत. या गृह प्रदर्शनात अ‍ॅफोर्डेबल होम्स, लक्झुरिअस होम्स, व्यावसायिक प्रकल्प, ओपन प्लॉट असे प्रॉपर्टीमधील गुंतवणुकीसाठीचे अनेक पर्याय संभाव्य ग्राहकांना पाहता येणार आहेत़ पुणे, पिंपरी-चिंचवड व संपूर्ण पुणे जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांची माहिती एकाच छताखाली मिळणार असल्यामुळे या प्रदर्शनामध्ये वेळेची व पैशाची बचत होणार आहे़ आपल्या स्वप्नातील व आपल्या गरजेप्रमाणे हवे असणारे मनपसंत घर येथे इच्छुक ग्राहकांना पाहता येणार आहेत़ गुढीपाडव्याचा सण लक्षात घेता अनेक बांधकाम व्यावसायिकांनी नवनवीन आकर्षक योजना आखलेल्या असून, या प्रदर्शनामध्ये घराचे बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना याचा फायदा मिळणार आहे. गेल्या ३ वर्षांमध्ये अनेक इच्छुकांनी आपले पुण्यातील घर नक्की करत हे प्रदर्शन यशस्वी केले आहे.पुण्याचा विस्तारणारा परिघ, घराच्या वाढत्या किमती, उच्च जीवन शैली, शिक्षणाचे नवनवीन पर्याय, नोकरी व उद्योगातील आधुनिक संधी यामुळे महाराष्ट्राच्या अनेक भागांतून लोकांचा पुण्याकडे येण्याचा कल नेहमीच असतो़ पुण्यातील प्रॉपर्टीमधील गुंतवणूक ही आजवर अनेकांना फायदेशीर ठरल्यामुळे अनेकांनी राहत्या घरासोबत सेकंड होम म्हणून पुण्याचाच विचार केला जातो़ (प्रतिनिधी)