शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

पुणे बनणार मंचचे आज आयोजन

By admin | Updated: May 5, 2017 03:02 IST

कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी पुन्हा एकदा कलर्स प्रस्तुत लोकमत सखी मंच आयोजित ‘पुणे बनेगा मंच’ हा नावीन्यपूर्ण

पुणे : कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी पुन्हा एकदा कलर्स प्रस्तुत लोकमत सखी मंच आयोजित ‘पुणे बनेगा मंच’ हा नावीन्यपूर्ण कार्यक्रम सदस्यांच्या भेटीला येत आहे. गोव्यासह महाराष्ट्रात महिलांच्या मनामनात राज्य करणारे लोकमत सखी मंच आणि लोकप्रिय चॅनल कलर्स परत एकदा सज्ज झाले आहे. प्रत्येक व्यक्तीच्या अंगी काही ना काही कला असते. फक्त त्या कलेला एक मंच हवा असतो. हा मंच देण्याचा प्रयत्न कलर्स प्रस्तुत लोकमत सखी संच आयोजित ‘पुणे बनेगा मंच’ या कार्यक्रमात होणार आहे. कुठल्याही परीक्षकाशिवाय ही स्पर्धा होणार आहे. तुमच्या शहरातील जनता ठरविणार. विजेताही तुमच्या नजरेसमोर हा कार्यक्रम शुक्रवारी (दि. ५) सायंकाळी ५.३० वाजता कन्यादान मंगल कार्यालय, हडपसर येथे आयोजित केला असून यात तुम्हाला येत असलेल्या अशा कलेचे प्रदर्शन तुम्हाला करायचे आहे, जी कला तुम्ही मंचावर प्रस्तुत करू शकाल. हाच कार्यक्रम आता राज्य पातळीवर ‘महाराष्ट्र बनणार मंच’ नावाने होणार आहे. यामध्ये सोलो, ड्युएट किंवा ग्रुप नृत्य, अभिनय, मिमिक्री, पेंटिंग, वादन, जादूचे प्रयोग, जिम्नॅस्टिक, आॅर्केस्ट्रा, कवायत, योगासने, कठपुतली, मेकअप आर्ट, कीर्तन, भजन, भारुड, खंजिरीवादन, ढोल पथक आदी व यांसारखे कलाप्रकार सादर करता येतील. सादर करण्यासाठी लागणारे साहित्य स्पर्धकांनी स्वत: आणावे. तेव्हा भाग घ्या आणि जिंका भरपूर बक्षिसे. कलर्स चॅनलने आपल्या चोखंदळ प्रेक्षकांसाठी एका नावीन्यपूर्ण शोचे आयोजन केले आहे. ‘इंडिया बनेगा मंच’ या नावातच याचे वेगळेपण दडले आहे. हा कार्यक्रम कलर्स चॅनलवर ७ मेपासून प्रत्येक शनिवारी व रविवारी रात्री ९ वाजता प्रक्षेपित होणार आहे. याअंतर्गत भारतातील प्रमुख शहरांमध्ये नावाजलेल्या जागांवर, चौकांमध्ये किंवा मॉलमध्ये या कार्यक्रमांतर्गत कलाकार सामील होऊ शकतील आणि आपल्या प्रतिभेला पंख देतील. कुठल्याही परीक्षकांशिवाय कोलकाताचा हावडा ब्रिज, दिल्लीचा लाल किल्ला, इंडिया गेट, मुंबईची जुहू चौपाटी अशा सुविख्यात नावाजलेल्या जागी कलाकारांचा कलाविष्कार आणि भारतीय जनतेचा कौल अशा पद्धतीने हा कार्यक्रम चॅनलवर रंगणार आहे. (प्रतिनिधी)आपल्या शहरात शुक्रवारी (दि. ५) या दिवशी ‘पुणे बनणार मंच’ होत आहे. यामध्ये भाग घेऊन जिंका आकर्षक पुरस्कार. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी ०२०- ६६८४८५८६ या क्रमांकावर सकाळी ११ ते ५ संपर्क करा. ही स्पर्धा पाहण्यासाठी सखी मंच सदस्यांना आग्रहाचे निमंत्रण देण्यात येत आहे.