शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विज्ञान केंद्रावर कृषी सप्ताहाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:11 IST

या सप्ताहाच्या उद्घाटनास ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादा भुसे, ना. जयंत पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, ...

या सप्ताहाच्या उद्घाटनास ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादा भुसे, ना. जयंत पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विश्वजित कदम, शंकरराव गडाख , भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन मोहपात्रा, उपसंचालक सुरेश चौधरी, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, राज्याचे कृषी प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषि आयुक्त धीरज कुमार, डॉ. सुहास जोशी आदी उपस्थित राहणार आहेत.

राज्यातील असंघटित क्षेत्रातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना बळकटी देण्यासाठी विकेल ते पिकेल, एक जिल्हा एक उत्पादन ही संकल्पना राबविण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र बारामतीची राज्य सरकार व केंद्र सरकार मार्फत स्टेट लेवल टेक्निकल इन्स्टिट्यूट म्हणून निवड झाली आहे . राष्ट्रीय अजैविक स्ट्रेस प्रबंधक संस्था, अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि बायर कंपनी यांच्या प्रयत्नातून हा कृषी तंत्रज्ञान सप्ताह पार पडत आहे. दर वर्षीच्या कृषक प्रदर्शनातील प्रक्षेत्र भेटीसह फूड प्रोसेसिंग, डेअरी टेक्नॉलॉजी, प्रक्रिया उद्योग, मार्केटिंग, ब्रँडिंग आदी तंत्रज्ञानाचा यात समावेश असेल. याशिवाय मिलेट वर्ल्ड मधील वैशिष्ट्यपूर्ण खाद्य पदार्थांच्या प्रक्रिया उद्योगाशी निवडीत लाईव्ह डेमो पाहता येणार आहेत.

कृषी सप्ताहात मुंबई येथील भाभा अनुसंशोधन केंद्र उत्पादित हायड्रोजेल तंत्रज्ञान, एकात्मिक शेती प्रणाली ६५ प्रकारची औषध वनस्पतींची संजीवनी बाग, मुरघास उत्पादन तंत्रज्ञान, गाई व म्हैशीतील गर्भ प्रत्यारोपण तंत्रज्ञान, तसेच अ‍ॅग्रीकल्चर स्टार्टअप, इस्राईल व नेदरलँड येथील डच तंत्रज्ञानासह विविध प्रयोगांचा समावेश आहे.

शासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून सामाजिक सुरक्षित अंतर ठेवून प्रत्येक व्यक्तीचे शारीरिक तापमान मोजून,मास्क व सॅनिटायझरचा वापर करून शेतकऱ्यांना प्रवेश देण्याचे नियोजित असल्याचे यावेळी सांगण्यात आले.