शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

संघटना बांधणी आवश्यक

By admin | Updated: August 11, 2014 03:44 IST

पक्षाची संघटना बांधणी व्यवस्थित नाही़ माहिती मिळत नाही़ कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे, अशा तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इच्छुक उमेदवारांनी आज निरीक्षकांपुढे केल्या़

पुणे : पक्षाची संघटना बांधणी व्यवस्थित नाही़ माहिती मिळत नाही़ कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे, अशा तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इच्छुक उमेदवारांनी आज निरीक्षकांपुढे केल्या़ विधानसभेसाठी मनसेचे निरीक्षक विधानसभेचे गटनेते बाळा नांदगावकर, राजन शिरोडकर, रिटा गुप्ता यांनी पुणे शहरातील ८ मतदारसंघांतील ४७ इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या़ या वेळी त्यांनी संघटनेमधील खटकणाऱ्या बाबी या निरीक्षकांपुढे व्यक्त केल्या़ मनसे इच्छुकांच्या मुलाखती आज असल्या तरी, बऱ्याच जणांना काल सायंकाळपर्यंत त्यांच्या विधानसभा मतदारसंघाच्या मुलाखती कधी आहेत, याची माहिती नव्हती़ नियोजनाप्रमाणे सुरुवातीला पिंपरीतील मुलाखती होणार होत्या. पण, त्यात बदल करून प्रथम पुणे शहरातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या़ विधानसभा मतदारसंघात इच्छुक असणाऱ्या सर्वांना एकाचवेळी बोलविण्यात आले़ खडकवासला मतदारसंघात सर्वाधिक १० इच्छुक असून, कसबा आणि कँटोन्मेंटमध्ये प्रत्येकी तिघे इच्छुक आहेत़ शिवाजीनगरमध्ये ४ जण इच्छुक आहेत़ निरीक्षकांनी त्यांना तुम्ही आपसांत एकमत करून एक नाव सुचवा, असे सांगितले़ पण, दोन्ही ठिकाणी एकमत न झाल्याने शेवटी आता आम्ही ठरवू, असे त्यांनी सांगितले़ आज सकाळपासूनच मनसेच्या इच्छुकांनी नारायण पेठेतील मनसे कार्यालयाबाहेर शक्तिप्रदर्शन केले़ खडकवासला, वडगाव शेरी, हडपसर इच्छुकांच्या समर्थकांची जास्त गर्दी होती़ सायंकाळी कोथरूड मधील इच्छुकांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला़(प्रतिनिधी)