शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अवयवदानामुळे चौघांना जीवदान

By admin | Updated: March 30, 2017 02:31 IST

पिंपरी-चिंचवड येथील ४७ वर्षीय महिलेचा २५ मार्चला अपघात झाला होता. तिला उपचारांसाठी खासगी रुग्णालयात

पुणे : पिंपरी-चिंचवड येथील ४७ वर्षीय महिलेचा २५ मार्चला अपघात झाला होता. तिला उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अपघातात मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने मंगळवारी (दि.२८) रात्री महिलेला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. नातेवाइकांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्यानंतर ग्रीन कॉरिडॉरचा वापर करुन महिलेचे हृदय दीड तासात मुलुंडमधील फोर्टिस हॉस्पिटलला नेण्यात आले. शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्याने ४० वर्षीय महिलेला जीवदान मिळाले. एक किडनी आणि एक यकृत पुण्यातील रुबी हॉस्पिटलला, तर १ किडनी पिंपरी-चिंचवडमधील बिर्ला हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपण करण्यात आली, अशी माहिती पुणे झेडटीसीसीच्या प्रमुख आरती गोखले यांनी दिली. रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ४७ वर्षीय महिलेला ब्रेन डेड घोषित करण्यात आल्यानंतर रुग्णाच्या नातेवाइकांनी अवयव दान करण्याची परवानगी दिली. त्यानंतर राज्याच्या झोनल ट्रान्सप्लांट कोआॅर्डीनेशन सेंटरने (झेडटीसीसी) प्रतीक्षा यादीनुसार ब्रेन डेड रुग्णाचे हृदय मुलुंडला, १ किडनी आणि १ यकृत पुण्याला रवाना केले, तर १ किडनी बिर्ला हॉस्पिटलमधील रुग्णाला देण्यात आली. याबाबत सांगताना बिर्ला हॉस्पिटलचे डॉ. संजीव कुमार जाधव म्हणाले, की बुधवारी दुपारी दीड वाजता शस्त्रक्रिया सुरु झाली. शस्त्रक्रिया ५ वाजून ५ मिनिटांनी यशस्वीपणे पार पडली. ग्रीन कॉरिडॉरचा वापर करुन बिर्ला हॉस्पिटल ते पुणे विमानतळ हे २६ किलोमीटरचे अंतर २२ मिनिटांत पार करण्यात आले. पुण्यातून चार्टर्ड विमानाने ६.३० वाजता हृदय मुंबईला पोचवण्यात आले. तेथील ४० वर्षीय महिलेमध्ये हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आणि तिला जीवनदान मिळाले. डॉ. जाधव आणि डॉ. अन्वय मुळे यांच्या टीमने हे प्रत्यारोपण पार पाडले. रुबी हॉस्पिटलमधील ५६ वर्षीय महिलेला यकृत, तर ६२ वर्षीय महिलेला किडनी प्रत्यारोपण केले, अशी माहिती डॉ. शीतल महाजन व डॉ. अभय सदरे यांनी दिली. (प्रतिनिधी)अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे हृदय मुंबईमधील एका रुग्णालयात विमानाद्वारे पोचवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी चिंचवड ते विमानतळ असा ‘ग्रीन कॉरिडॉर’ राबवला. चिंचवड ते विमानतळ हे २६ किलोमीटरचे अंतर अवघ्या २३ मिनिटांत पार करुन हृदय सुरक्षितपणे विमानापर्यंत पोचवल्याची माहिती उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली. या ग्रीन कॉरिडॉरसाठी आदित्य बिर्ला रुग्णालयाकडून वाहतूक पोलिसांना पत्र देण्यात आले होते. संध्याकाळी पाच वाजून २७ मिनिटांनी रुग्णालयामधून रुग्णवाहिका हृदय घेऊन निघाली. वाहतूक पोलिसांनी रुग्णवाहिकेपुढे एक पायलट व्हॅन ठेवली होती. या व्हॅनचे नेतृत्व सहायक निरीक्षक आर. एन. पिंगळे करीत होते. रुग्णालयातून निघाल्यानंतर डावीकडे वळून रिव्हर व्ह्यू चौकातून चापेकर उड्डाणपुलावरून ही रुग्णवाहिका अहिंसा चौक, लोकमान्य हॉस्पिटलकडून पुलावरुन महावीर चौकामध्ये नेण्यात आली.डी मार्टवरून उजवीकडे वळून ग्रेड सेपरेटरमधून नाशिक फाटा, फुगेवाडी, सीएमई चौक, बोपोडी चौक, खडकी रेल्वे स्थानकासमोरील चर्च चौकातून पोल्ट्री फार्म चौकातून डावीकडे वळून मुळा रस्ता सर्कलवरुन नेण्यात आली. होळकर पुलाखालून उजवीकडे वळून चंद्रमा चौकातून आळंदी रस्ता, डॉ. आंबेडकर सोसायटी जंक्शन, येरवडा पोस्ट आॅफिसवरुन जेल रस्ता चौकातून गॅरिसन इंजिनिअरिंग चौकातून उजवीकडे वळून लोहगाव विमानतळावर रुग्णवाहिका पोहोचली. रुग्णवाहिकेला जाण्यासाठी वाट मोकळी करुन देण्यासाठी वाहतूक थांबवण्यात येत होती.पश्चिम भारतातील हृदय प्रत्यारोपणाची पहिली शस्त्रक्रिया २०१५ मध्ये करण्याची संधी मला मिळाली. गेल्या दोन वर्षांमध्ये अवयवदानाबाबत मोठी क्रांती घडून आली आहे. नागरिकांमध्ये जनजागृती होत असल्याने अवयवदानाचा निर्णय घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना जीवदान मिळाले आहे. - डॉ. संजीवकुमार जाधव