शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरीतील बीओटीचे काम सुरू करण्याचे आदेश

By admin | Updated: October 1, 2015 01:03 IST

जेजुरीतील बहुचर्चित बीओटी तत्त्वावर बांधण्यात येत असलेल्या शाळा खोल्या व गाळ्यांचे काम पुन्हा सुरू करण्याच्या सूचना बांधकाम सभापतींनी दिल्या आहेत.

पुणे : जेजुरीतील बहुचर्चित बीओटी तत्त्वावर बांधण्यात येत असलेल्या शाळा खोल्या व गाळ्यांचे काम पुन्हा सुरू करण्याच्या सूचना बांधकाम सभापतींनी दिल्या आहेत. आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत विरोधकांनी याला विरोध केला असून, काम सुरू झाले, तर ते पुन्हा बंद पाडणार, असा इशारा दिला आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी, शासनाने २००८ रोजी शासन निर्णय पारित करून जिल्हा परिषदेच्या रिकाम्या जागा ‘बांधा वापरा हस्तांतर करा’ या तत्त्वावर विकास करा, असा आदेश दिला होता. त्यानुसार पुणे जिल्हा परिषदेने ११ प्रकल्प हाती घेणेचे प्रस्तावित केले होते. सर्वसाधारण सभेत चर्चा होऊन प्राथमिकपणे जेजुरी, बिबवेवाडी व शिरूर येथे शाळा, विश्रामगृहे, कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, कार्यालयीन इमारत आदींची अत्यंत आवश्यकता असल्याने सर्वानुमते ठरवले होते. त्यास शासनाने दि. २.५.२००९ रोजी मंजुरी दिली. त्यानुसार जेजुरी येथील मुख्य चौकात असलेल्या जिल्हा परिषदेच्या जागेतील जुन्या शाळेच्या जागेवर बीओटी तत्त्वावर शाळा वर्गखोल्या व गाळ््यांचे बांधकाम करण्यास २0११ मध्ये मंजुरी मिळाली होती. १२ हजार ४३३.४५ चौरस मीटरमध्ये हे बांधकाम करण्यात येत असून, १६१९.१ लाख रुपये इतका खर्च या प्रकल्पाला होणार आहे. यात रेस्ट हाऊस, मराठी शाळा, कंपाउंड वॉल, लॅन्ड डेव्हलपमेंट, पाण्याची टाकी बांधण्यात येत आहे. यातील १५ ते २० टक्के बांधकामही झाले आहे. मात्र, बीओटी तत्त्वावर हे बांधकाम करण्यास विरोधकांनी विरोध केला होता. तसेच सुरू असलेले काम हे निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार उपअभियंता पुरंदर यांनी कामास भेट देऊन सुरू असलेले काम तांत्रिकदृष्ट्या अयोग्य रीतीने होत असल्याचे पत्र २२ फेबु्रवारी २0१३ रोजी दिले होते. त्यानुसार हे काम बंद ठेवण्यात आले होते. २२ सप्टेंबर २0१५ रोजी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे सभापती मंगलदास बांदल यांनी सदर काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आज जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत हे काम सुरू करण्यासाठी टिप्पणी मांडण्यात आली होती. मात्र, याला विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला. शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य दशरथ काळभोर यांनी हे काम सुरू झाले, तर पुन्हा बंद पाडू, असा इशारा दिला असून, बीओटी तत्त्वावरच हे काम करण्याचा उद्देश काय? जिल्हा परिषद स्वत: ही जागा का विकसित करीत नाही, असा सवालही केला आहे. (प्रतिनिधी)