पुणे : शासनाचा आर्थिक बोजा कमी व्हावा यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करण्यास स्थगिती होती. ही स्थगिती उठविण्यात आली असून, त्यानुसार आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, पॅरामेडिकल स्टाफ अशी पदे मुक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील विविध संवर्गातील रिक्त पदांपैकी १० हजार ८५५ पदे भरण्यात येणार आहेत. राज्य शासनाने शासकीय सेवेतील सर्वच विभागातील पदे भरण्यावर निर्बंध घातले होते. यासंबंधीचा शासन निर्णय काढण्यात आला. यामध्ये वैद्यकीय विभागाचाही समावेश होता. शासनातील कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च नियंत्रित करण्यासाठी अर्थ खात्याने अशाप्रकारे नोकर भरतीवर निर्बंध घातले होते. आरोग्य विभागातील पदे मुक्त करण्याबाबत आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. अर्थ खात्याने या संवर्गातील रिक्त पदांच्या ७५ टक्के पदे भरण्याची मुभा दिल्याने रिक्त पदांची भरती प्रक्रिया जलद होणार आहे. बुधवारी हा शासननिर्णय जाहीर झाला असून राज्यभरात २२५ विशेषज्ञांची तर ४५० पदवीधारकांची पदे भरण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. या शासन निर्णयानुसार वैद्यकीय अधिकाऱ्यांची ११५२, पॅरामेडिकल स्टाफ गट संवर्गाची ५३०६, तर गट संवर्गाची २७८९ आणि राज्य कामगार विमा योजनेतील २३१७ रिक्त पदे भरली जाणार आहेत.
वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्याचे आदेश
By admin | Updated: December 1, 2015 03:29 IST