शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश

By admin | Updated: March 20, 2017 04:38 IST

आपली मोटार चोरीला गेली नसल्याचे माहिती असतानाही खोटी फिर्याद दिल्याबद्दल महिलेविरुद्ध गुन्हा

पुणे : आपली मोटार चोरीला गेली नसल्याचे माहिती असतानाही खोटी फिर्याद दिल्याबद्दल महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे़ हदिसुन्निसा वाहिदुल्ला खान (वय ३०, रा़ काळेपडळ, हडपसर) असे या महिलेचे नाव आहे़ याप्रकरणी वाहाब मोहंमद नइम खान (वय ३६, रा़ सय्यदनगर, महंमदवाडी, हडपसर) यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ओ़ ए़ साने यांच्या न्यायालयात दाद मागितली होती़.याबाबतची हकिकत अशी, हदिसुन्निसा खान यांनी वानवडी पोलीस ठाण्यात १४ आॅक्टोबर २०१५ रोजी मोटार लोकांनी चोरून नेल्याची फिर्याद दिली होती़ या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना ही मोटार वाहाब खान यांच्याकडे मिळून आली़ पोलिसांनी त्यांच्यासह दोघांना अटक केली व पोलीस कोठडी घेतली़ पोलिसांनी केलेल्या तपासात हदिसुन्निसा खान आणि वाहाब खान यांची पूर्वीपासून ओळख होती़ ते उत्तर प्रदेशात शेजारी शेजारी राहणारे आहेत़ ही मोटार हदिसुन्निसा खान त्यांच्या नावावर असली तरी त्याचे हप्ते हे वाहाब खान भरत होते़ त्यामुळे एक वर्षापासून ती त्यांच्याच ताब्यात होती़ त्याबाबतची कागदपत्रे सादर केल्यावर वानवडी पोलिसांनी या गुन्ह्यात बी समरी अहवाल दाखल केला़ न्यायालयाने हा अहवाल मान्य करून त्यांची सुटका केली़ त्यानंतर वाहाब खान यांनी अ‍ॅड. हर्षद मांडके यांच्यामार्फत लष्कर न्यायालयात दाद मागितली़ न्यायालयाने खोटी फिर्याद दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत़ (प्रतिनिधी)