शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

रवींद्र बऱ्हाटेच्या मालमत्ता जप्तीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेच्या मालमत्ता जप्तीचे आदेशाची कार्यवाही न्यायालयाने सुरु केली आहे. बऱ्हाटे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेच्या मालमत्ता जप्तीचे आदेशाची कार्यवाही न्यायालयाने सुरु केली आहे. बऱ्हाटे विरुद्ध पकड वॉरंट जारी केले. त्यानंतरही तो मिळून आला नाही. त्यानंतर न्यायालयाने ३ नोव्हेंबर रोजी जाहीरनाम्याचा आदेश काढून तो पुणे शहर व परिसरामध्ये सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध केला होता. तरीही तो न मिळून आल्याने आता स्थावर मालमत्त जप्तीचे आदेश न्यायालयाकडून प्राप्त करुन घेऊन पुढील कार्यवाही पुणे पोलीस करीत आहेत.

माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र बऱ्हाटे, तथाकथीत पत्रकार देवेंद्र जैन, बडतर्फ पोलीस शैलेश जगताप यांच्यासह १३ जणांच्या टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानूसार (मोक्का) कारवाई केली आहे. हडपसर येथील गुन्हयात बऱ्हाटे व त्याच्या साथीदारांनी संघटीतपणे टोळी करुन जीवे ठार मारण्याची धमकी, बंगला बळकाविण्याचा प्रयत्न केला होता. हडपसरच्या गुन्हयासह त्याच्याविरुध्द शहर व ग्रामीणमध्ये १४ हून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बऱ्हाटे व त्याच्या साथीदारांविरुध्द पहिला गुन्हा कोथरुड पोलीस ठाण्यात ७ जुलै २०२० रोजी दाखल झाला होता. बांधकाम व्यवसायिकाला बलात्काराच्या गुन्हयात अडकवण्याची धमकी देऊन २ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी त्याने केली होती. त्यानंतर १२ जुलै रोजी समर्थ पोलीस ठाण्यातही एका बांधकाम व्यवसायिकाला धमकावून त्याच्याकडून ७२ लाख रुपये घेऊन आणखी पावणेदोन कोटी रुपयांची मागणी केल्याचा गुन्हा दाखल झाला. तर तिसरा गुन्हा हडपसर पोलीस ठाण्यात दाखल झाला. त्यामध्ये कोथरुड व औंध येथील जमिनीत गुंतवणूक केल्यास दामदुप्पट पैसे मिळतील असे आमिष दाखवून एकाची ३० लाख रुपयांची फसवणूक केली होती. तर चौथा गुन्हा केटरींग व्यवसायीकाने दाखल केल्यावरुन हडपसर पोलीस ठाण्यातच दाखल झाला होता. बहुतांश गुन्हयात बऱ्हाटे व त्याच्या साथीदारांनी संघटीतपणे कट रचून नागरिकांना धमकावणे, खंडणी मागणे, मालमत्ता बळकाविणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे या स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

..........

फरार एका साथीदाराला अटक

हडपसर केटरींग व्यवसायीकाने दाखल केलेल्या गुन्हयात बऱ्हाटे टोळीतील फरार असलेला आरोपी गणेश मधुकर आमंदे(वय ४५, रा.टिळक रोड) याला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश मोरे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत लोहकरे, पोलीस नाईक मोहसिन शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली. या गुन्हयामध्ये आजवर ६ आरोपी अटक केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्र देशमुख यांनी दिली.